बरबडा। बरबडा येथील येताळेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते, किर्तनकार अविनाश भारती यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नवरात्र महोत्सवा निमित्त गुरुवारी बसस्टॅण्ड या ठिकाणी ठिक 7 वाजता आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व जनतेनी घ्यावा असे येताळेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
अविनाश भारती हे लहान पानापासून च त्यांना वक्तृत्व स्पर्धा, कवी म्हणण्याचा छंद असल्याने व किर्तन ऐकण्याची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात येऊन लोकांना प्रबोधन करण्याचे ठरविले आणि त्यांनी कमी वेळात आपली छाप महाराष्ट्रावर पाडली. अशा सर्वसंपन्न गुण असणारा व्याख्याता, कवी, किर्तनकार, अभिनय, वेगवेगळ्या कला अंगात असणारा असल्यामुळे यांची ख्याती महाराष्ट्रात च नसून इतर राज्यात सुद्धा आहे. त्यांचे कार्यक्रम राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात पण मोठया प्रमाणात त्यांचे कार्यक्रम होतात.
असा ख्यातनाम असणारे बरबडा नगरीत येऊन लोकांना प्रबोधन करणार आहेत हे पण बरबडा वासियांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारा व्याख्याता येताळेश्वर दुर्गा मंडळाने त्यांना पाचारण करून त्यांच्या श्रोत्यांना त्यांच्या कविता, व्याख्यान, आणि समाजप्रबोधन करणार असल्याचे या मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनी आईवडील यांच्या वर मोठया प्रमाणात व्याख्यान करून समाजात जागृती करण्याचे काम करीत असतात. त्यांनी लोकजागर करत अनेकांना व्याख्यान व किर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा करून अनेकांना घडविण्याचे काम आपल्या माध्यमातून करत असतात असे सांगितले जाते. या दुर्गा मंडळाने दररोज भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.