नवीन नांदेड। विष्णुपुरी येथील गट ७२ व ७५ या गावठाण व गायराण जमिणीवरील अतिक्रमण केलेल्या नागरिकांना मालकी हक्क मिळावा यासाठी दि २७ सप्टेंबर रोजी ४० नागरिक , महिलानी ग्रामपंचायत कार्यालय येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. या मालकी हक्कासाठी शासनस्तावरील " शक्ती प्रदत्त" समितीचा निर्णयानंतर त्यांना मालकी हक्क देण्यात येईल अशी प्रतिक्रिया विष्णुपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.संध्या विलासराव हंबर्डे व ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे यांनी दिली.
विष्णुपुरी ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत येथील गट क्र. ७२ व ७५ या गावठाण व गायराण जमिनीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गट ७२ या जिमिनीवर लेआऊट तहसिल कार्यालयाने केला आहे गट, क्र ७५ हा जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आलेल्या गावठाण व गायराण जमिनीवर येथील अतिक्रमण केले आहे. यात विष्णुपुरी ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या नातेवाईकांनी या जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्याचे सदस्य रद्द करण्याची तक्रार केल्यानंतर संबंधीत अतिक्रमण करणाऱ्याची चौकशी करुन अहवाल सादर करताना ग्रामपंचायत कार्यालयाने त्या जागेचा नमुना नं ८ हा कार्यालयीन कामासाठी उपयोगासाठी वापरण्यत आलेल्या कागदपत्रांत आँनलाईनची प्रत माहिती अधिकारात कागदपत्रे मागितले असता त्याना आँनलाईन अर्जाची प्रत देण्यात आल्यानंतर त्या सदस्याना अर्जासारखी आमच्या जमिनीची आँनलाईन प्रत आम्हाला देण्यात यावी अशी मागणी करत आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता .
या संदर्भात ग्रामपंचायत विष्णुपुरी यांनी गट ७२ व ७५ मधील गायराण व गावठाणावरील अतिक्रमण करणाऱ्या २९२ नागरिकाची यादी नांदेड गटविकास अधिकारी यांच्या शक्ती प्रदत संकेतस्थावर याची नोंद करुन केली आहे . यासंदर्भात आजपर्यत कुठलाच निर्णय होवु शकला नाही . त्यामुळे यासंदर्भात उपोषण करणा-या कुठलीच हमी देता येत नाही असे सांगत त्याच्या निर्णयाअंती त्याना नमुना न ८ देता येईल ,हा सर्व निर्णय शासनस्थरावर असल्याचे प्रतिक्रिया विष्णुपुरी ग्रामपंचायत सरपंच सौ संध्या विलास हंबर्डे व ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे यांनी दिली तर या ऊषोणाला भगवान हंबर्डे, ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी अनिल हंबर्डे यांनी पाठींबा दर्शविला व ऊषोणात सहभाग नोंदविला.