नांदेड। आज दि.२३/०९/२२ रोजी माननीय श्री आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड यांचे उपस्थित पशुवैद्यक दवाखाना श्रेणी_२ निळा अंतर्गत निळा गावातील चार महिन्यांच्या वरील गाय व बैल वर्ग गोट पोक्स लसीकरण गायीचे पूजन करुन मा. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत सुरुवात केली.
यावेळी गावचे सरपंच श्री रोहित इंगोले ,प्रल्हाद पाटील जोगदंड ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूपेंद्र बोधनकर डॉ अविनाश बुन्नावार तालुका पशुधन विकास अधिकारी ,पशुधन पर्यवेक्षक श्री. शिवाजी डाकोरे व गावातील प्रतिष्ठित मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती डॉ. बोधनकर यांनी दिली व मा.आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी गावातील सर्व नागरिकांना गोट पोक्स लसीकरण गोचिड,गोमाशी निर्मूलन व गोटे फवारणी करण्याचे पशुपालकांना आवाहन केले.
पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात चांगले काम होत असून पशुपालकांनी लंपि आजाराला न घाबरता टोल फ्री क्रमांक १९६२ कॉल करावे किंवा संबंधित पशुवैद्यक दवाखान्याच्या डॉक्टरशी संपर्क संपर्क साधून उपचार व लसीकरण करून घेण्याचे ग्रामस्थांना सांगितले.