हिमायतनगर| येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या कार्याची दाखल घेऊन स्मृतिशेष गुरवर्य एम. पी.भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील गुरवर्य एम. पी.भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी कर्तव्यदक्ष अधिकारी, आदर्श समाजसेवक, पदाधिकारी, शिक्षक, सिनेकलाकार हास्यकलाकार लाेककलावंत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत दि. १८ सप्टेंबर रविवारी पाेटा ता.हिमायतनगर येथे लाेककलावंत मेळावा आणि आदर्श समाजसेवक, पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, सिनेकलाकार हास्यकलाकार लाेककलावंत यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यंदाचा कर्तव्यदक्ष अधिकारी हा पुरस्कार हिमायतनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन याना जाहीर झाला होता. संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या दिवशी विविध तपास कामी गेल्यामुळे बालाजी महाजन हे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही.
त्यामुळे त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार आज दि.२३ सप्टेंबर रोजी हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी.भुसनूर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. यावेळी बहुजन टायगर्स फाेर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, नागोराव मेठेवाड, धम्मपाल मुनेश्वर, विष्णू जाधव, प्रमोद थोरात, डीएसबीचे कुलकर्णी, पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, सुधाकर कदम आदींची उपस्थिती होती.