हदगाव, शे. चांदपाशा| हदगाव तालुक्यात पाळीव जनावराच्या लम्पी त्वचारोगाची आजार पसरत आहे का..? गायीचे दुध प्यायचे की नाही ? या बाबतीत पशुसंवर्धन अधिका-याकडुन स्थानिक पातळीवर जनजागृतिची आवश्यकता असुन, माञ या बाबतीत स्थानिक माध्यमाना काहीच माहीती मिळत नाही.
हदगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय मध्ये पशुसंवर्धन विभाग आहे. कोण अधिकारी आहेत अनेकदा विचारणा केल्यावर ही माहीती मिळत नाही. दुध उकळुन पिल्यास हे आजार धोका कमी होतो का. या बाबतीत स्थानिक प्रशासनाकडुन या बाबतीत जनजागृति होने अत्यावश्यक असुन, अशी नागरिकांत मागणी होत आहे. विशेष म्हणजे रविवारी राज्याचे पशुधन दुग्दविकास मंञ्यानी हदगाव तालुक्यातील एका गावातील नागरी सत्कारा मध्ये नादेड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे त्यांनी जिल्ह्यातील जनावरांतील 'लम्पी त्वचारोगाच्या' जनवारांच्या आकडेवारी कमी संख्या पाहुन दुग्ध विकास मंञी जाम खुश झाले होते.
त्यांनी आपल्या भाषणात पशुसंवर्धन विभागाचे अभिनंदन केले. जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने हदगांव पंचायत समिती कार्यालयच्या पशुसंवर्धन विभागाला भेट दिली असता 'लम्पी 'आजारामुळे नागरिकांना दुध प्यावे की नाही..? या बाबतीत माञ माहीती देण्यास कोणीच संबंधित विभागाचे आधिकारी किवा कर्मचारी नव्हते. 'लम्पी' आजार जनावारा पासुन दुसऱ्या दुसऱ्या जनवारास होऊ शकतो काय..? हा आजार माणवाला होते की नाही... तसेच लम्पीची लागण झालेल्या जनवाराचे दुध घ्यावे की नाही जर डेअरीवरचे दुध किती तापवावे या बाबतीत जनजागृति संबंधित विभागाकडुन स्थानिक पातळीवर होणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले. परंतु या बाबतीत आधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत ही दिसुन आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.