मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा.डॉ. प्रकाश धनसिंग राठोड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांनी नुकतेच भूगोल विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे . आजपर्यंत त्यांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रकाशित झाले आहेत .
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. दिलीप आहेर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. मधुकर राऊत , क्रीडा संचालक प्रा.डॉ. जयदीप कहाळेकर आणि तसेच वरिष्ठ , कनिष्ठ आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.