खा.खतगावकर ,आ.हंबर्डे यांचे आवाहन
नविन नांदेडl नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने माता काळेश्वर मंदिर विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदिरापर्यंत शनिवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सव सुरु होताच माता रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातील भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात.रत्नेश्वरी गडाचा पौराणिक ग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. माता रत्नेश्वरीच्या अनेक अखयिका कथन केल्या जातात.न वरात्रात महिला-भगिनींकडून, भक्तगणांकडून श्री माता रत्नेश्वरीची खणा-नारळाने तसेच साडी-चोळीने ओटी भरून तिचे आशीर्वाद घेतले जातात.
१ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार्या पदयात्रेचे औचित्य साधून श्री माता रत्नेश्वरी देवीला साडी-चोडी अर्पण करण्यात येणार असून भव्य पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार माता रत्नेश्वरी देवी स्नानादी व महापुजाविधीसाठी काळेश्वर येथे येत असत, माता रत्नेश्वरी देवीची साडी-चोळी व ओटी भरण्याची पारंपारिक प्रथा आहे. ही प्रथा पुढे चालू रहावी व यानिमित्त तमाम भाविकांना दर्शनासाठी योग जुळवून यावा, या हेतूने १ ऑक्टोबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत तमाम भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व माता रत्नेश्वरीला साडी-चोळी अर्पण सोहळा व पालखी सोहळ्याचे साक्षीदार बनावे,असे आवाहन माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले आहे.