सौ. भागीरथी बच्चेवार यांनी समजिक, शैक्षणीक, क्षेत्रात अग्रेसर राहुन शाळेत अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबऊन शाळेतील विद्यार्थ्यांना स्काउट गाईड मध्ये राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करुन दिला. राष्ट्रिय कार्यात पल्स पोलिओ,साक्षरता अभियान,बालविवाह प्रतिबंध,कुटुंब नियोजन, रक्तदान शिबिर,झाडे लावा झाडे जगवा,वाचन,लेखन स्पर्धा, रेल्वे स्टेशन स्वच्छता,पोलिस स्टेशन स्वच्छता, कोविड काळात जेष्ठ नागरिकाना अन्न धान्य, वाटप, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या 'सारखे अनेक अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मराठवाड्यातून सौ. भागीरथी बच्चेवार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदारील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनराज वीसपुते हे होते तर व्यासपीठावर सौ.मनिषा पवार ,उप संचालक मुंबई विभाग,अनिल बोरनार, सुधीर शेठ, डॉ.भगवान सिंग राजपुत, ज्ञानेश्वर मैत्री, उपशिक्षणाधिकारी सौ. सुनिता चांदुरकर, संपादक डे शाहु संभाजी भारती यांच्या सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे, पुरस्कार मिळाल्या बदल अभिनंदन होत आहे.