मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव जाहीर; लातूरच्या विभागीय सचिवपदी उदगीरचे सचिन शिवशेट्टे यांची वर्णी -NNL

मुंबई| मराठी पञकार परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील जिल्हा व तालुकापातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राज्यभरातील सर्व विभागांच्या विभागनिहाय सचिवांच्या नियुक्त्या परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये लातूर विभागाच्या विभागीय   

सचिवपदी उदगिरचे सचिन शिवशेट्टे यांची वर्णी लागली असून नवनियुक्त सर्व विभागीय सचिवांचे सर्वञ कौतुक होत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज परिषदेच्या नऊ विभागीय सचिवांच्या नावांची घोषणा केली आहे.नव्या विभागीय सचिवांची मुदत दोन वर्षांची असेल. नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे (कंसात विभाग व कार्यक्षेञातील जिल्हे ) -

दीपक कैतके (मुंबई विभाग ),जे.डी.पराडकर संगमेश्वर (कोकण विभाग- ठाणे,पालघर,रत्नागिरी, रायगड),किशोर महाजन, मालवण (कोल्हापूर विभाग :- सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली जिल्हा),अरूण नाना कांबळे, पिंपरी-चिंचवड(पुणे विभाग : पुणे,सातारा,सोलापूर जिल्हा), रोहिदास हाके,धुळे( नाशिक विभाग :- नाशिक,धुळे, नंदुरबार,जळगाव अहमदनगर जिल्हे),बालाजी सूर्यवंशी, औरंगाबाद ( संभाजीनगर विभाग - संभाजीनगर, जालना, बीड,परभणी जिल्हे),सचिन शिवशेट्टे,उदगीर (लातूर विभाग:-लातूर,नांदेड, उस्मानाबाद,हिंगोली जिल्हे),

अमर राऊत,मेहकर (अमरावती विभाग:-अमरावती,बुलढाणा, अकोला,यवतमाळ,वाशिम), संजय देशमुख,नागपूर ( नागपूर विभाग,नागपूर,गडचिरोली, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,) आदींच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. विभागीय संघटक,महिला संघटक आणि अन्य पदांसाठीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.नवनियुक्त सर्व  विभागीय सचिवांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.नवे विभागीय सचिव संघटनेचा विस्तार आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी