नांदेड जिल्हा मराठवाडयात नंबर वन ठरण्यासाठी सर्वानी प्रामाणिक सेवा द्यावी - सिईओ वर्षा ठाकुर- घुगे -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
सर्व नांदेड जिल्ह्यात सेवा पंधरवाडा अभियान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जयन्तीपर्यंत चालणार आहे. त्यातच माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाला आज नवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. आमच्या आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती जिल्हा परिषदेच्या बाजू आहेत. या काळात सेवा देणे आपले आद्य कर्तव्य आहे, सेवा देताना नांदेड जिल्हा प्रथम क्रमांक कसा येईल यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिपच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकुर - घुगे यांनी केले.


ते हिमायतनगर येथील पंचायत समितीच्या वतीने श्री परमेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने सेवा पंधरवाडा अंतर्गत तक्रार निवारण दि. २६ आक्टोंबर रेाजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या मंचावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी सदर कार्यक्रमास दुपारी भेट देउन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी ४ विशेष अतिथी म्हणून उपस्थित झालेल्या जिपच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकुर घुगे यांनी भेट दिली. यावेळी प्रथम प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 


त्यानंतर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या कि, सर्वच विभागातील महिला जिल्हापरीषदचे अधिकारी, कर्मचारी असुन जि प च्या माध्यमातुन सेवा करण्याच्या सुवर्ण संधीचा योग या माध्यमातून आला आहे. आपण सर्वांनी मिळुन लोकप्रतिनिधि, गावचे सरंपच, जेष्ट, युवा, युवतींचा विश्वास संपादन करुन आपला तालुका सेवा पंधरवाडामध्ये जिल्हयात प्रथम कसा येईल यासाठी नियोजन बध्द काम करावे. जिल्हा परिषद गावागावात सर्व सेवा उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था आहे. आपल्या संस्थेचे नाव लौकिक होण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले तर मराठवाडयात आपला जिल्हा नंबर वन होउ शकतो. नारी शक्तीला नवरात्र महोत्सवात सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करून नवरात्रोत्सवात कंची चुणुक दाखवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.


या काळात सेवा देताना कसल्याही अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने काम करुन सेवा करावी. सेवा पंधरवाडयात आपआपल्या गावातील अंगणवाडी, उपआरोग्य केद्र, शाळा, गाव स्वच्छ कसं राहिल यासाठी स्वच्छतेसह खाउ, पोषण आहारासह गावाचा चेहरा बदलण्यासाठी सर्वांनी मिळुन काम केले पाहिजे. लाभार्थ्याचे चेहरे सदैव खुष राहण्यासाठी तत्परतेने वेळीच काम कसे होतील याकडे देखील लक्ष दयावे. सुदैवाने आपण जि प मध्ये सेवेत असुन मानधन, पगार आपणास मिळत असुन स्वताच घर ज्या प्रमाणे स्वच्छ ठेवतोत त्याच प्रमाणे आपले गाव स्वच्छसुंदर ठेवण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रा प कडुन नागरीकंाना नमुना नंबर आठ, नोंदणी प्रमाणपत्र यासह जी कागदपत्रे लागतात ती वेळेवर मिळतील अशी व्यवस्था करावी. यासह पोषण आहाराचा कार्यक्रम आणि माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमाचीही सुरुवात झाली आहे. यासह सर्व सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदचे आमचे अधिकारी कर्मचारी कटिबद्ध आहेत असेही त्या म्हणाल्या.  
 


गावकरी बांधवांना स्वच्छतेसह सामुहिक कार्यव्रमात सहभागी करुन तालुक्यात आपले गाव पहिले कसे येईल यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्याने 16 तालुक्यापैकि जिल्हयात आपला तालुका कसा प्रथम येईल यासाठी नियोजनबध्द काम करण्याकडे लक्ष केद्रित करण्याच्या सुचना त्यांनी येवेळी केल्या. अंगणवाडी पासुन सर्वच विभागाने समाधान कारक काम करणा-या विविध गटात तिन विजेत्यांना जिल्हा पराषदे कडुन गौरव करण्यात येणार असल्याचे सिइओ ठाकुर यांनी जाहिर करतांना गटविकास अधिकारी आंदेलवाड यांना बेस्ट पुरस्कार मिळण्यासाठी त्यांनी चौफेर लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हणाल्या.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी मयूर आंदेवाड यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ दत्तात्रय गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. व्यासपीटावर गटविकास अधिकारी मयूर आंदेवाड, ग शि अ बालाजी शिंदे, चिचोंर्डी प्राथमिक आरेाग्य केद्राच्या वैदकिय अधिकारी डॉ सुप्रिया पैलेवाड,  प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांची उपस्थिती होती. संचलन व अभार शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील कोसमेटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, विशाल पवार, धनराज धर्मेकर यांच्यासह कर्मचा-यंानी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, परीचारीका, समुपदेशक अधिकारी, ग्रामसेवकांची उपस्थिती होती. यावेळी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण सिइओ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.


सवना ज येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी सिइओ वर्ष ठाकुर घुगेे यंाच्या कार्याच्या हातोटीचे तोडभरुन कौतुक केले. सवना ज सह तालुक्यातील उपआरोग्य केद्रासह तालुका आरेाग्य अधिकारी, कर्मचारी, परीचारीका, समुपदेशक अधिकारी मुख्यालयी राहतील याबाबीची गंभीरपणे दखल घेण्याची विनंती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली. गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, अधिक्षक डॉ गायकवाड, गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे हे स्वता आपले वर्तव्य प्रामाणिक करीत असल्यामुळे आपआपल्या विभागात प्रगती करण्यासाठी सदैवा प्रयत्न करीत असल्याचे गोपतवाड म्हणाले. टेम्भूर्णी, सवना ज अनेक गावात स्मशानभुमी नसुन, स्मशानभुमीला रस्ता देखील नसल्यामुळे अतिव्रष्टिच्या काळात म्रतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक एक दिवस थांबुन म्रतदेहाची विटबना परंपरे प्रमाणे होत असल्याचे गोपतवाड म्हणाले.


आज नवरात्री असल्याने नारीशक्तीने संकल्प केला आहे, या सेवा पंधरवडा काळात सर्व प्रकारच्या सेवा देऊन हिमायतनगर तालुका कसा पुढे येईल यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे नियोजनबद्ध कार्यक्रमातून समोर आले आहे. आजच्या या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व माता भगिनींना आगामी नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरण जाओ सारवण सुख समृद्धी व ऐश्वर्या मिळो अश्या प्रकारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर घागे यांनी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी