डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या मिस इंडिया प्लस साईज 2022 -NNL

मिस इंडिया प्लस साईज 2022 चे विजेते नांदेडच्या डॉ. सान्वी जेठवाणी


नांदेड।
मेवन प्रोडक्शन्स तर्फे देशपातळीवर विश्वसुंदरी स्पर्धा मिस इंडिया ची स्पर्धा दिल्ली येथे आयोजित करण्यात येते त्याचा पाचवा सीजन 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान दिल्लीच्या विवांता द्वारका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं सदरील स्पर्धेमध्ये वजनाने जाड असलेल्या अशा युवती व महिलांना सहभाग नोंदवता येते सुंदर दिसण्याचा अधिकार फक्त आकार पुरता मर्यादित नसून ही सुंदरता मनातून असली पाहिजे या हेतूने व जाड माणसांना सुद्धा सुंदर दिसण्याचा अधिकार आहे हे उद्देश ठेवून ही स्पर्धा 2017  वर्षी सुरुवात झाली. 

यावर्षीचा पाचवा वर्ष असून यामध्ये चार झोन मधून स्पर्धकांची निवड होत असते यामध्ये पश्चिम विभाग पूर्व विभाग दक्षिण व उत्तर अशा विविध चाचण्यामधून 900 स्पर्धकांनी पहिली चाचणीसाठी नोंदणी केली होती यातून प्रत्येक विभागातून वीस स्पर्धक म्हणजे 80 स्पर्धकांची निवड दिल्लीच्या अंतिम फेरीसाठी झाली होती या अंतिम फेरीतून 30 पुन्हा शेवटी दहा अशा सर्व चाचण्या पार करत अंतिम दहा मध्ये पोहोचणारे नांदेडचे डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या दुसऱ्या मिस इंडिया प्लस साईज 2022.


या स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्मा अभिनेत्री फिजा खान मिस इंडिया च्या प्रशिक्षिका रिटा गंगवानी, अमन ग्रेवल सिमरत कथुरिया व प्रसिद्ध सीने फोटोग्राफर अमित खन्ना व प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट चीना मरवाह ही सर्व मंडळी परीक्षक म्हणून काम पाहत होती. मेव्हेन्स प्रोडक्शन चे संचालक हरदीप अरोरा यांनी विजेत्याला सुंदरी ताज स्मृतीचिन्ह व अनेक बक्षीस देऊन डॉ. सान्वी यांना मिस इंडिया प्लस साईज 2022 चे खिताब दिले. 


यासोबत त्यांना सब टायटल म्हणून ग्लॅम गॉडस म्हणजे सुंदरतेची देवता हे खिताब देखील दिले. प्लस साईज मध्ये मिळणाऱ्या विश्वसुंदरीचा किताब भारतातील पहिला तृतीयपंथी असल्याचं मान डॉ. सान्वी जेठवाणी यांना मिळालं. आयोजक व परीक्षकांनी सानवी या कुठल्या महिला पेक्षा कमी नसल्याचं आपल्या भाषणातून नमूद केलं. नांदेड साठी एक मानाचा तुरा रोवणारी ही उपलब्धी आहे. जेठवाणी यांचा आज वाढदिवस देखील आहे त्यांनी हा वाढदिवसा निमित्त मिळालेले फार मोठे पुरस्कार व गिफ्ट असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पुढील त्यांना विविध प्रॉडक्टच्या ब्रँड साठी साईन देखील करण्यात आला आहे. बॉलीवूड मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास ते देखील आम्ही करू असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी