हदगाव,शे.चांदपाशा। हदगांव शहरापासून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या डोंगरगांव येथील टेकडीवर असलेले जगदंबा देवीचे मंदिर, पायथ्याशी असलेल्या तलाव,निसर्ग रम्य वातावरण असून, जागृत देवस्थान आसलेल्या जंगदबा देवीच्या मंदीरात देखील घटस्थापना करण्यात आली आहे. माता जगदंबा देवीचे मंदीर हे चिंरेबंदी असू हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम असून, मंदीराची निर्मीती सुमारे आठशे वर्षा पुर्वीची आसल्याचे गावकरी, भक्तमंडळी सांगतात डोंगरगाव येथिल जगदंबा देवीच्या दर्शनासाठी पंचकोशीतील भाविक भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येऊन मनोभावे पूजा करतात नऊ दिवस सकाळी व सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते महारती होते.
या महारतीचा परिसरातील हजारो भाविक भक्त लाभ घेतात, हदगाव शहरातून दररोज शेकडो भाविकांची सकाळी तीन वाजता पासून अनवाणी पायाने दर्शनासाठी रीघ लागलेली दिसून येते गडावर असलेले मंदिर चहुबाजूंनी झाडी,रोडच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव गडावर मंदिर माता जगदंबा देवीचे मंदिर रोषणाईने आकर्षक ,लखलखाट लायटिंग प्रसन्न परिसर भक्तांना याठिकाणी दर्शन घेतल्याने प्रसन्नता वाटते आशा प्रतिक्रिया भक्त करतात
तसेच तालुक्यातील हदगाव हिमायतनगर रोडवर आसलेल्या वाळकी बाजार येथील जागृत देवस्थान आसलेले माता इसाई देवीच्या मंदीरात नुकतेच दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायकाळी घटस्थापना करुन यात्रेला प्रांरभ झाला. या ठिकाणी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातुन भावीक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात.
वाळकी बाजार या गावात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी माता इसाई देवीच्या मंदीरात घटस्थापना करण्यात आली आहे.माता इसाई देवीची चुलीमध्ये मुर्ती हे निद्र आवस्थमध्ये आसुन या मंदीराची निर्मीती कधी झाली याचा कुठे उल्लेख आढळून आला नसल्याचे या गांवचे भूमिपुत्र निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश भगवानराव कदम यांनी सांगितले. देवीच्या मंदीराचे हेमाडपंथी पद्दतीने बांधकाम केलेले असुन, देवीच्या मुख्य प्रवेशव्दारा समोर एक मातीची व दोन भव्य आशा चिरेबंदी दिपमाळ आहेत.
या देवाची नित्य नियमाने सेवा करणारे पुजारी विठ्ठलराव धर्माजी गायकवाड, व त्यांचे लहान बंधु शामराव गायकवाड आहेत. माता इसाई देवीच्या जन्म पुजार्याच्या घरामधील चुलीमध्ये बैलभंडार आढळुन आणि हाच देवीचा जन्म आसल्याचे पुज्यार्याने सांगितले. तसेच माता इसाई देवीच्या घटस्थापने पासुन गावामध्ये विविध धार्मीक कार्यक्रम चालु आसल्याने गावात भक्तीमय वातावरण असते. नवरात्रात दर्शन घेण्यासाठी दूरदूरचे भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.