उमरखेडमध्ये भाजप व काँग्रेसला मोठं खिंडार, अनेकांचा मा खा सुभाष वानखेडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश-NNL


उमरखेड।
उमरखेडमध्ये भाजप व काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, शेकडो कार्यकर्त्यांचा माजी खा.सुभाषराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे भारी पाडतील असं वातावरण सध्या निर्माण केले जाते आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरू आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.परंतु नांदेड,हिंगोली तसेच यवतमाळ जिल्ह्याच चित्र पाहता काहीसं वेगळं दिसून येत आहे.माजी खा.सुभाषराव वानखेडे यांच्या स्वगृही परतण्याने शिवसेनेला पुन्हा संजीवनी प्राप्त झाली अशी चर्चा तीनही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत रंगू लागली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना,  पक्षाला मोठा धक्का बसला. कारण, पक्षातून मोठ्या संख्येनं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा हात धरला. परंतु उमरखेडमध्ये राजकीय भूकंप झाला असून भाजपा व कांग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे.

आज उमरखेड येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी खा सुभाषराव वानखेडे यांनी आपल्या खास शैलीत बडखोरांचा खरपूस समाचार घेतला. शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हा उमरखेड मधील भाजपा व काँग्रेस पक्षाला धक्का मानला जात आहे. या कार्यक्रमास यवतमाळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री पराग पिंगळे तसेच तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख विभागप्रमुख शाखा प्रमुख व युवासैनिक शिवसैनिक यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी