आरोग्य कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ननितीन पांढरे यांचा सत्कार समारंभ -NNL

दुसरा शनिवार व चौथा शनिवार रजा मंजूर करण्यात यावी या कर्मचारी महासंघाच्या मागणीस अखेर यश 

शासकीय कर्मचारी वर्गाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी हिंगोली जिल्हा महासंघाच्या वतीने प्रयत्न प्रगतीपथावर

कर्मचारी महासंघाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात लवकरच आरोग्य कर्मचारी पतपेढी स्थापन करण्यात येणार


हिंगोली।
आरोग्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. नितीन बबन पांढरे साहेब यांचा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला असून, या सत्कार समारंभात हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व शासकीय कर्मचारी वर्ग व कर्मचारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी, संघटक मान्यवरांची उपस्थिती होती. 

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चतुर्थ श्रेणी वर्ग चार आरोग्य कर्मचारी वर्गास इतर विभागाप्रमाणे दर महिन्यातील दुसरा शनिवार व चौथा शनिवार सुट्टी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आरोग्य कर्मचारी महासंघ हिंगोली यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत होता, अखेर कर्मचारी महासंघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष मा. श्री. नितीन पांढरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मागणीला मा. जिल्हाशल्य चिकित्सक साहेब हिंगोली यांच्या वतीने मंजुरी देण्यात आली असून, कर्मचारी महासंघ संघटनेच्या या यशानंतर आज दिनांक 6 आँगस्ट 2022 रोज शनिवार रोजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. नितीन पांढरे साहेब यांचा सत्कार समारंभ सामान्य रुग्णालय हिंगोली येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमुर्ती कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन पांढरे यांनी महासंघाच्या आगामी वाटचालीबद्दल दोन शब्द व्यक्त करताना शासकीय कर्मचारी वर्गाच्या सर्व प्रलंबित मागण्यासाठी कर्मचारी महासंघ यापुढेही कर्मचारी वर्गाच्या मागे उभा राहून, असाच पाठपुरावा करत राहील असे आश्वासन देऊन लवकरच महासंघाच्या वतीने लवकरच हिंगोली जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी पतपेढी काढण्यात येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली असून, सत्कार समारंभात सर्वानी दिलेल्या शुभेच्छा बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. 

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री.नितीन पांढरे(जिल्हाध्यक्ष) , लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून मा.हरनामसिंग पथरोड, मा. प्रभाकर खिल्लारे, मा. शेख युसुफ मा. प्रकाश मुकाडे, मा. गजानन चव्हाण हे होते यावेळी सत्कारमुर्ती मा. श्री. नितीन जी पांढरे साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, व कार्यक्रमात यावेळी  इतर उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला, उपस्थित मान्यवरामध्ये  मा.संजय सागरे मा. रामकृष्ण पंडित, सचिन रूपुरूकर, रवी तुरूकमाने, एस. ए. डोलारे, हरिकिशन धनगर, श्रावण बोथीकर, रमेश जाधव,  केरबा सावंत, राजेश पुंड, अरविंद थोरात,सतीष कदम, शहबाज पठाण, तसेच महिला प्रतिनिधी सुनंदा जाधव, कौशल्याबाई चेपूरवार, मंगला बेले, सुनिता मुदिराज, सुनिता ढाकरे, ममता जैस्वाल यांची कार्यक्रमास उपस्थिती होती यावेळी कार्यकर्माचे सूत्रसंचालन मा. हरी धनगर यांनी केले तर प्रास्ताविक मा. हरनामसिंग पथरोड यांनी केले तर आभारप्रदर्शन गंगाधर चेपूरवार यांनी केले अशाप्रकारे सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय, कंत्राटी कर्मचारी वर्ग व महासंघ संघटनेच्या पदाधिकारी व महासंघ संघटनेच्या महिला प्रतिनिधी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी