हिमायतनगर। घरो घरी तिरंगा मोहिमेसाठी हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथिल जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढुन जनजागृती केली.
सरसम येथील जिल्हा परीषदेची हि शाळा नांदेड जिल्हयात पहिली ISO मानांकन प्राप्त मॉडेल शाळा असुन, नांदेड जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांनी तीन वेळा येथे भेट दिली आहे.
यंदा स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष शासनाने साजरे करण्याच निश्चित केल आहे, या पार्श्वभुमीवर सर्व शासकिय यंत्रणा वेगवेगळ्या पध्दतीने जनजागृती करीत आहेत. या अनुषंगाने जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसमच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभात फेरी काढुन गावात जनजागृती केली. विद्यार्थ्याच्या माध्यमातुन प्रत्येक घरी तिरंगा अभियानाची माहिती सांगण्यास शिक्षकांनी बोलत केल आहे.