नांदेड| आज रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे छात्रसंमेलन संपन्न झाले.छत्रसंमेलन च्या प्रमुख अतिथी म्हणून श्री. रामदास पाटील सुमठाणकार तर प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु.अंकिता पवार उपस्थित होत्या.छात्रसंमेलनामध्ये या शैक्षणिक वर्षांतील 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 ची महानगर कार्यकरिणी घोषणा करण्यात आली.या शैक्षणिक वर्षासाठी महानगराध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. संजय पेकमवार व महानगरमंत्री म्हणून गणेश हत्ते यांची निवड करण्यात आली.
यावेळी श्री.रामदास पाटील सुमठाणकार यांनी विध्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की ‛ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणारी एकमेव विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होय.’तसेच देवगिरी प्रांतमंत्री कु..अंकिता पवार यांनी विद्यार्थी परिषदेची 75 वर्षातील प्रवास मांडला.यावेळी नांदेड महानगरमंत्री गणेश हत्ते,महानगराध्यक्ष प्रा.संजय पेकमवार व मोठ्या संख्येने छात्र शक्ती उपस्थित होती.