नांदेड। नशामुक्त अभियानाअंतर्गत येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचा संकल्प घेतला आहे.
देशात विशेषतः युवा वर्गातील वाढते व्यसनाचे प्रमाण चिंतेची बाब आहे. देशातील सर्व नागरिक व्यसनापासून दूर राहावे यासाठी देशभरात नशामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक १२ रोजी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात व्यसनमुक्ती संकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी व्यसनमुक्ती मुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव आपल्या विचारातून व्यक्त केली.
भविष्यात प्रत्येक जन व्यसनमुक्त राहावे यासाठीची सुरुवात आपल्यापासून व्हावी असा सल्ला देत त्यांनी कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती संकल्पाची प्रतिज्ञा दिली. यावेळी विशेष शिक्षक गणेश धुळे, संजय रुमाले, मुरलीधर गोडबोले, आनंद शर्मा, कला शिक्षक मधुकर मनुरकर, सौ. संगीता नरवाडे, सौ मनीषा तिवारी, सौ. सुप्रिया कराड, किरण रामतिर्थे, अविनाश सुरनर गयाबाई सोनकांबळे, श्याम घंटेवाड, शेख आरिफ, भिमराव दहिकांबळे, दत्ता रामतिर्थे, जिजाबाई खरटमोल आदी कर्मचाऱ्याची उपस्थिती होती.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली. शाळेपासून निघालेल्या या रॅलीस संस्थेचे डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी हिरवा झेंडा दाखविला. या रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या तसेच देशभक्तीपर गीतांचेही वादन यावेळी करण्यात आले. शाळेपासून निघालेली ही रॅली नवा मोंढा, मगनपुरा, आनंद नगर, वसंत नगर मार्गे काढण्यात आली.