नांदेड। देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना नांदेड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करून शाळेत जाण्याच स्वप्न,,,,स्वप्नच ठरत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अमृत महोत्सवी वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत गणवेश वाटप करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी विपिन इटनकर भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आदित्य शिरफुले कामारीकर यांनी केली आहे.
शासनामार्फत सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश दरवर्षी दिल्या जातात. 2022-23 शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन ते तीन महिने लोटले आहेत. तरी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाले नाही त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने लक्ष देऊन जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद परिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांना तात्काळ गणेश वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात.
तसेच दिरंगाई केलेल्या संबंधित अधिकाऱ्यास व मुख्याध्यापकास कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी अशी मागणी भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरफुले यांनी केली आहे.