जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यात सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे ५० टक्के पेक्षा जास्त क्षेञ बाधीत झाल्याने शासन निर्णयानुसार पिकांचे संभाव्य ऊत्पादनात ५० टक्के घट झाल्याने तालुक्यातील सर्वच महसुल मंडळात पिक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ जमा शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेतृत्व बालाजी पाटील ढोसणे यांनी नांदेड जिल्हाचे जिल्हा कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे येथे भेट घेवुन केली.
मुखेड तालुक्यात खरीप हंगाम २०२२ सालच्या अतीवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे मुखेड तालुक्यात ४०२२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला.यामुळे सरळसरळ शासन नियमानुसार ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान व संभाव्य ऊत्पादनात ५० टक्के पेक्षाही जास्तीची घट दिसुन येत असल्याने तात्काळ युनायटेड इंडीया पिक विमा कंपनीला शेतकर्यांना आगाऊ रक्कमेची २५ टक्के रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे युवा नेतृत्व बालाजी पाटील ढोसणे यांनी केली. यावेळी त्र्यंबक पाटील हसनाळकर,गंगाधर जाधव वसुरकर यांची ऊपस्थीती होती.
गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण पिकविम्याच्या २५ टक्के अग्रीम मंजुरी साठी चालढकल केली तर ५ सप्टेबंर पासुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषणा बसणार असल्याचे बालाजी पाटील ढोसणे यांनी निवेदनातून सांगीतले.