हिमायतनगर। तालुक्यातील बोरगडी तांडा येथे सिंधू संस्कृती जपत तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळेस गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता व त्या ठिकाणी बाल वक्ते यवतमाळ येथील दिशा कडावत यांनी बोरगडी तांडा येथील समाज बांधवांना संबोधित केले.
गोर बंजारा समाजामध्ये तीच उत्सव म्हणजे मागील 7000 वर्ष पूर्वीपासून गोर बंजारा समाज तीच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सिंधू घाटी मोहन जोदारो हरप्पा येथून तीज महोत्सव साजरा करण्याचा निर्धार गोर बंजारा समाजाने घेतला होता. आजही भारतातील गोर बंजारा समाज तीज उत्सव साजरा करतो सिंधू संस्कृती ला जपत प्रत्येक तांडा वाडी मध्ये हा सण साजरा करण्यात येते तीज म्हणजे एका दुरडीमध्ये गहू टाकून नऊ दिवसाचे नंतर त्या ठिकाणी गावातील तरुणी व वेगवेगळ्या तांड्यातील तरुणींना त्या सणाचा मोठ्या उत्साहाने तिज हा सण साजरा केला जातो.
त्यामाणे आज हिमायतनगर तालुक्यामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बोरगडी तांडा येते बाल वक्ते दिशा कडावत यांनी बोरगडी तांडा वाशीयांना संबोधित केले त्यावेळेस गावातील नायक कारभारी व महिलावर्ग व गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरसेना हिमायतनगर स्वयंपूर्ण टीम त्या कार्यक्रमास हजेरी लावली व संघटना बांधण्याची चर्चा ही केले.
त्यावेळेस गोर सेना तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी अशाच पद्धतीने पुढेही भरभरून प्रतिसाद द्यावे व समाजामध्ये रूढी परंपरा धाटी जपून ठेवावे व गोर बंजारा समाजाचे तीज सना सारखं गोर बंजारा समाजा मधिल. सर्वच सन साजरा करावे असे त्यांनी सांगितले व गोर सेनेचे ता. प्रसिद्धी प्रमुख कृष्णा राठोड यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले.