देगलूर| पेट्रोलचा भडका उडाल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगा यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.
देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील सूर्यकांत माधवराव सक्रप्पा (५२) यांना विडी पिण्याची सवयी होती. बीडी पीत असताना पिचकारीमध्ये ते पेट्रोल टाकत होते. यावेळी तोंडातील विडी पेट्रोलवर पडल्याने मोठा भडका उडाला. या भडक्यात बाजूलाच बसलेली त्यांची पत्नी गंगुबाई सूर्यकांत सक्रपा (५०), मुलगा कपिल सूर्यकांत सक्रपा (२०) यांच्यासह स्वतः सूर्यकांत सक्रपा असे तीन जण पेटले. गंभीर भाजल्याने या तिघांना देगलूरच्या रुग्णालयात प्रथमाेपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.