प्राचार्य एस एल कोंडावार यांच्या प्रयत्नांना यश ● सन 2022-23 पासून 40 जागांची वाढ
लोहा| लोह्याच्या शासकीय आयटीआय रौप्य महोत्सवी वर्ष म्हंजेब२५ वर्षात पदार्पण करीत असतानाच या संस्थेची भव्य इमारत उभी राहिलीं. प्राचार्य एस एल कोंडावार यांच्या प्रयत्ना मुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रिये पासून इलेक्ट्रिशन व फिटर या नव्या दोन ट्रेडला मान्यता मिळाली असून ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. आणि पुढे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
शासकीय आय टी आय लोह्यात १९९७ पासून सुरू आहे. संस्था चालू झाल्यापासून संस्थेत एकूण सहा व्यवसायाच्या सहा तुकड्या चालु होत्या परंतु कालानुरूप रेडिओ अँड टेलिव्हिजन मेकॅनिक या ट्रेडची मागणी कमी झाल्यामुळे व तो ट्रेड बंदकरण्याचा निर्णय शासनाने घेतला या आयटीआय मध्ये आजघडीला पाच ट्रेडच्या पाच तुकड्या चालू होत्या.
2010 मध्ये संस्थेतील इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर व ड्रेस मेकिंग या ट्रेडच्या दुसऱ्या तुकडीसाठी अफिलेशन घेण्यासाठी निर्णय झाला पण आफीलेशन ला सामोरे गेल्यानंतर भारत सरकारच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग डी जी टी न्यु दिल्ली यांनी 15 जून 2010 ला इलेक्ट्रिशियन फिटर व वेल्डर या व्यवसायाच्या दुसऱ्या तुकडीला आफिलेशन दिले खरे परंतु संस्था भाड्याच्या इमारतीमध्ये चालत असल्यामुळे जागे अभावी व संस्थेकडून विहित वेळेत पाठपुरावां न केल्यामुळे 12 वर्षापासून इलेक्ट्रिशियन व फिटर या तुकड्यांना (२०१०) मध्ये शासनाकडुन मंजुरी मिळूनही ते दोन ट्रेड अद्याप पर्यंत चालू करणे शक्य झाले नाही.
विद्यमान प्राचार्य एस एल कोंडावार यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून व नवी भव्य इमारत त्यामुळे ट्रेड व तुकड्या वाढीसाठी प्रयत्न केले. आयटीआय सुरू झाला तेव्हा पासूनचे सर्व दस्तऐवज खंगाळून पाहिले दस्तावेजांचा अभ्यास केला. नवीन इमारतिचे तत्कालीन आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या काळात २०१९मध्ये उदघाटन झाले होते. त्यांनी नवीन ट्रेडसाठी पत्रव्यवहार केला होता.
संस्थेत इलेक्ट्रिशन व फिटर या ट्रेडला मंजुरी मिळाली ते ट्रेड चालू करण्यासाठी आवश्यक जागा वीज, पाणी व इतर भौतिक सोयी सुविधा उपलब्ध असल्याची खात्री प्राचार्य कोंडावार यांनी वरिष्ठ पातळीवर करून दिली. इलेक्ट्रिशियन व फिटर या ट्रेड च्या दोन तुकड्या वाढीसाठी सतत चार महिन्यापासून पाठपुरावा त्यांनी केला. सहसंचालक श्री सुर्यवंशी ,निरीक्षक श्री राठोड,कार्यालयीन अधिक्षक( तांञिक ) श्री परदेशी या टीमने प्राचार्य यांच्या पाठपुराव्यास सकारात्मक शिफारस संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे केली. संस्थेतील सदर दोन ट्रेडच्या दोन तुकड्यांना चालू करण्यासाठी संचालक यांनी मान्यता दिली.
या शैक्षणिक वर्षापासून (२०२२-२३) लोह्याच्या शासकीय आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन व फिटर या दोन ट्रेड च्या प्रत्येकी एक तुकडीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रत्येकी २० या प्रमाणे ४० जागा वाढल्या. कार्यरत ट्रेडच्या सध्याची प्रवेश क्षमता 104 होती. आता ती 40 ने वाढवून 144 झाली त्यामुळे लोहा व तालुका परिसरातील आणखी 40 विद्यार्थी यांचा रोजगार निश्चित झाला आहे. त्यांना कौशल्य युक्त शिक्षण घेवुन स्वत:च्या पायावर उभा टाकण्यास मदत होणार आहे. हे प्राचार्य कोंडावार यांच्या पाठपुराव्यामुळेच झाले. येत्या काळात आणखी तीन ते चार ट्रेड व सहा ते आठ युनिट वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य एस एल कोंडावार यांनी सांगितले.