हिमायतनगर। स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाने यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशा व्यक्तीने आपल्या योग्य माहिती स्तव प्रस्ताव विहित कालावधीत सादर करावेत.
असे आवाहन स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर आणि राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती प्रमुख सिने अभिनेते डॉ प्रमोद अबाळकर, डॉ.पी.बी.नामवाड, जगन्नाथ नरवाडे सरसमकर, दिलीपराव कावळे उमरीकर,लक्ष्मणराव मा. भवरे , प्रशांत विनायते, शाहीर नरेंद्र दोराटे यांनी केले आहे.
सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, प्रशासकिय,, शैक्षणिक, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील महिला, पुरुष यांना हे पुरस्कार दिले जातात आजपर्यंत अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सन 2021,2022 या वर्षांकरिता इच्छुकांनी आपल्या नांव, फोटो पत्यासह आवश्यक माहितीचा बायोडाटा असलेला प्रस्ताव पत्रकार त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे द्वरा लक्ष्मी सदन दिपकनगर तरोडा बु नांदेड ता.जि. नांदेड 431605 या पत्यावर31 आॅगस्ट 2022 पर्यत पाठवावेत अधिक माहितीसाठी 8975591881 या मोबाईल नंबर क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांनी कळविले आहे.