सकारात्मक दृष्टिकोण बाळगून शिक्षण आत्मसात करावा : लड्डू सिंघ महाजन -NNL

नवज्योत फाउंडेशन तर्फे गुणवंतांचे सत्कार संपन्न !


नांदेड| समाजाची शैक्षणिक दिशा निर्देशित करून एक प्रगतिशील समाज घडवण्याची आपल्यावर सामूहिक जवाबदारी आहे. सामाजिक संस्था किंवा व्यक्तींनी ती जवाबदारी स्वीकारली पाहिजे. दूसरीकडे विद्यार्थ्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोण बाळगून शिक्षण आत्मसात करावा असे प्रतिपादन गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन यांनी रविवार, दि. 21 ऑगस्ट रोजी नवज्योत फाउंडेशन तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात केले. ते कार्यक्रम अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्व प्रा. के. एच. दरक सर, उपसरपंच स. रणजीतसिंघ कामठेकर, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. शरणसिंघ सोढी, प्राचार्य स. गुरबचनसिंघ सिलेदार आणि नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष स. नौनिहालसिंघ जहागीरदार यांची उपस्थिती होती. 

स. लड्डूसिंघ महाजन आपल्या प्रतिपादनात पुढे म्हणाले की, आजचे युग प्रतीस्पर्धेचे युग असून शिक्षणाचे महत्व अबाधित झालेले आहे. शिक्षणासाठी पालकांचे योगदान अतुलनीय असते पण समाजाने देखील शैक्षणिक वातावरण निर्मिति करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवज्योत फाउंडेशन संस्थेचे कार्य उल्लेखनीय असे आहे. पुढे नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक विकास घडविण्यासाठी सक्रिय सेवा करावी असे ही त्यांनी सांगितले. 


प्रा. के. एच. दरक यांनी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात संधी शोधाव्या त्याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात दरक सर म्हणाले, करिअर घडविण्यासाठी सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. डॉक्टर आणि इंजिनियर होण्याची अनेकांची इच्छा असते आणि पालक वर्ग देखील तसे प्रयत्न करतात. पण इतर क्षेत्रात देखील स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. चांगले शिक्षण आत्मसात केल्याने व स्पर्धा परीक्षांची तयारी अवलंब केल्याने चांगले यश संपादन करता येऊ शकते हे नक्की. 

गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांनी आपल्या भाषणात गुरुद्वारा बोर्डाच्या मार्फत शिक्षणासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे असे सांगितले. तसेच प्रा. डॉ परविंदरकौर महाजन-कोल्हापुरे यांच्या सुचनेची दखल घेतली जाईल. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने अल्पसंख्यक मार्गदर्शन सेल सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले. डॉ परविंदरकौर यांनी विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यक सेल सुरु करून मार्गदर्शन द्यावे असे नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष स. नौनिहालसिंघ जहागीरदार यांनी केले. ते म्हणाले शीख समाजातील विद्यार्थी वर्ग चांगले शिक्षण आत्मसात करण्याकरीता परिश्रम घेत आहेत. यावर्षीही दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केलेले आहे. योगयोगाने नुकतच शीख समाजातील ज्येष्ठ नेते स. लड्डूसिंघ महाजन यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला आणि त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे आज सत्कार होत आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील साधक व्यक्तिमत्व प्रा. दरक सर येथे उपस्थित आहेत. समाजात वावरणारे व समाजासाठी झटणारे अनेकजण येथे उपस्थित आहेत. सर्वांच्या साक्षीने हा सत्कार सोहळा पार पडत असल्याचे आनंद आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. कुलप्रकाशसिंघ लिखारी यांनी केले तर आभार प्रदर्शन स. नवज्योतसिंघ जहागीरदार यांनी केले. यावेळी बोर्डाचे माजी अधीक्षक स. रणजीतसिंघ चिरागिया, स. सुरजीतसिंघ खालसा, स. रवींद्रसिंघ मोदी, स. भीमसिंघ बेलथरवाले, प्रा. डॉ परविंदर कौर महाजन कोल्हापुरे, प्रा. पी. के. जाधव, स. देवेंद्रसिंघ पटेल, स. सज्जनसिंघ सिद्धू, स. सतपालसिंघ गिल, स. गणपतसिंघ कामठेकर, हरमीतसिंघ रागी, मंगलसिंघ शेरे, स. प्रभज्योतसिंघ कामठेकर सह मोठ्या संख्येत पालकवर्ग आणि दहावी आणि बारावीत नेत्रदीपक यश संपादन करणारे विद्यार्थी उपस्थित होते. 

......

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी