देव दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील भाविकांचा तलावात बुडून मृत्यू -NNL


कंधार।
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे  सुफी संत हजरत सरवरे मगदूम साहेब यांच्या दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील भाविकांचा शहरालगत असलेल्या नवरंग पुरा शिवारातील जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मोहंमद साद मो. सफियोद्दीन (15), मोहंमद सफियोद्दीन मो.अब्द्दुल गफार (38), मोहंमद विखारोद्दीन मो.फारोद्दीन (44), सय्यद नविद सय्यद वाहिद (15) व सय्यद सोहेल सय्यद वहिद (20) अशी मृतांची नावे आहेत. नांदेड येथील करबला, खुदबेनगर आणि इक्बालनगर नांदेड येथील भाविक ऑटोरिक्षा (एमएच 26 बीडी 4531) ने कंधार येथील हजरत सरवरे मगदूम साहेब दर्ग्याला आले होते. ते श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील जगतुंग तलावाच्या किनारी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यापैकी मोहंमद साद मो. सफियोद्दीन हा पाण्याजवळ प्लेट धुण्याकरिता गेला असता पाय घसरून पडला. 

तो बुडत असल्याचे पाहून त्याचे वडील मोहंमद सफियोद्दीन मो.अब्द्दुल गफार (38) हे मुलाला वाचवण्याकरिता गेले असता तेही बुडत असल्याचे पाहून त्यांनी मेहुणा मोहंमद विखारोद्दीन मो.फारोद्दीन (44) यांना आवाज दिला. तत्पूर्वी सय्यद नविद सय्यद वाहिद (15) आणि त्याचाच सख्खा भाऊ सय्यद सोहेल सय्यद वहिद (20) यांनीही पाण्यात उडी टाकून वरील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यातील असलेल्या काटेरी कुंपणाच्या जाळ्यात अडकल्याने त्याचा जीव वाचवता आला नाही.

कंधार पोलिसांनी आणि दर्गापुरा, नवरंगपुरा येथील नागरिकांनी सदर भाविकांना कंधारच्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी मदत केली. या वेळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पडवळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कंधार, नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक मोरे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पोरे, डॉ. जी. एम. मोरेमाजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बहोद्दीन, उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे, बब्बर साहब, शेकापचे शेरूभाई आदी कंधार येथील नागरिकांनी कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी