भोकर। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरो घरी तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. नगर परीषद भोकर व दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत दिक्षाभुमी स्वंयसहायता महिला बचत गट तर्फे डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भोकर येथे तिरंगा झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले. बचतगटाचे श्रीमती ललिता जाधव अध्यक्ष, पंचशिला धुतुरे सचिव, सागर धुतुरे, जयशिला धुतुरे व पंचशिला वाघमारे या महिला तिरंगा झेंडा विक्री करत आहेत.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ राजाराम कोळेकर दंत शल्यचिकित्सक, डॉ नितीन कळसकर अस्थीरोग तज्ञ, डॉ अस्मीता भालके भुलतज्ञ, डॉ आर्शिया शेख स्रीरोग तज्ञ, डॉ. मुद्दशीर, डॉ जंगीलवाड, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे औषध निर्माण अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, बत्तलवाड प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, साबेर पाशा लिपिक, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अलि, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र,श्रीमती राजश्री ब्राम्हणे, जीजा भवरे, छाया बोड्डेवाड अधिपरिचारीका, मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे आरोग्य सेविका व नागरिक यांनी तिरंगा झेंडा खरेदी केला.