नांदेड| नागपूर -कोल्हापूर -नागपूर एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली असून, त्याचबरोबर नांदेड – संत्रागच्ची एक्स्प्रेसच्या दोन फेरी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने दिली आहे.
1) दिनांक 22 आणि 28 ऑगस्ट , 2022 रोजी सुटणारी गाडी संख्या 12767 नांदेड ते संत्रागच्ची एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 2) दिनांक 24 आणि 31 ऑगस्ट, 2022 रोजी सुटणारी गाडी संख्या 12768 संत्रागच्ची ते नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
नागपूर विभागातील ट्राफिक ब्लॉक मुळे नागपूर -कोल्हापूर -नागपूर एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे, पुढील प्रमाणे–१) दिनांक 19 ऑगस्ट 2022 ला कोल्हापूर येथून सुटणारी गाडी संख्या 11404 कोल्हापूर -नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २) दिनांक 20 ऑगस्ट 2022 ला नागपूर येथून सुटणारी गाडी संख्या 11403 नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.