नांदेडचा वैभव वाढवणारे महोत्सव म्हणजे डॉ. सानवी यांचे सप्तरंग - खा. चिखलीकर
नांदेडच्या रसिकांसाठी "सप्तरंगाची" उधळण - डॉ. सानवी जेठवानी
नांदेड| सप्तरंग सेवाभावी संस्था लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स नांदेड ,नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड, भारत सरकार सांस्कृति मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे सप्तरंग महोत्सव दिनांक 14 ते 16 या दरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत घेण्यात आला या कार्यक्रमाची लावणी, पोवाडा ,गोंधळ यांच्या कलाविष्काराने सप्तरंग महोत्सवाची सांगता झाली देशाच्या कानाकोपऱ्यातुन आठ राज्यातून विविध कलाकारांनी सहभाग नोंदवला जवळपास 500 च्या आसपास भारतातील विविध कलाकार विविध आविष्कार घेऊन सामील झाले होते या सप्तरंग महोत्सवामध्ये शास्त्रीय नृत्य उपशास्त्रीय नृत्य मॉर्डन डान्स, भरत नाट्यम ,संगीत संच कलेचे सादरीकरण तब्बल तीन दिवस अविरतपणे चालू होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सप्तरंग महोत्सवाचे संयोजक सानवी जेठवाणी यांचे भरभरून कौतुक केले नांदेडचा रसिकांसाठी सानवी जेठवाणी आणि त्यांच्या संच यांनी सप्तरंगाची उधळण केली असे तोंडभरून कौतुक केले तर या कार्यक्रमाला राजाश्रय मिळवून देऊ असे आश्वासन दिले सप्तरंग महोत्सव 2023 यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देऊन सर्व कलाकारांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. नांदेड एक पर्यटक स्थळ म्हणून व सांस्कृतिक नगरी म्हणून याची ओळख निर्माण व्हावी या हेतूने 2015 साली या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असे प्रतिपादन सान्वी जेठवाणी यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये केले.
नांदेडचा रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली नांदेडच्या वैभवात भर टाकण्यासाठी दुबई येथून कलाकारांचा संच सामील झाला होता म्हणून हा कार्यक्रम भारतापुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला असे उद्गगार माननीय खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी काढले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरियाणा येथील तब्बल तीस विद्यार्थी टीम आणि महाराष्ट्रातील तीस विद्यार्थी टीम यामध्ये कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी होती कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला या महोत्सवात दोन रंगमंचावर आणि जवळपास 370 कलाप्रकार स्पर्धेत सादरीकरण झाले होते.
या महोत्सवाप्रसंगी विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांनी उत्कृष्ट कार्य करून आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलं अशा मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार कला उपासक पुरस्कार समाजसेवा पुरस्कार सिंधू भूषण पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून मुंबई येथून तमन्ना नायर, नागपूर येथून पुजा हिरवाडे कोलकत्ता येथून कुशल भट्टाचार्य आणि औरंगाबाद येथून मिलिंद साळवी असे अनेक कलावंतांनी उत्कृष्ट परीक्षण केले. पाच वर्षाच्या मुली पासून ते पन्नाशी गाठलेल्या महिलांनी देखील या महोत्सवामध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले.
या महोत्सवामध्ये नांदेडच्या महापौर सौ जयश्रीताई पावडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षाताई घुगे ठाकूर, नांदेड महानगरपालिका चे आयुक्त श्री सुनील लहाने, नांदेड दक्षिणचे आमदार श्री मोहन हंबर्डे, नांदेड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ अपर्णा नेरलकर, भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे, डॉ. अजित गोपछडे, सौभद्र महाजन चे संचालक गणेश महाजन अशा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे सचिव श्री अक्षय कदम यांनी मानले सप्तरंग महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व मान्यवरांचा,कलावंतांचा तसेच आयोजन समिती सदस्यांच्या सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सदरील महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यकारणी समिती सदस्य गठित करण्यात आली होती त्या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला.