उस्माननगर| उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील यांनी नुतन कार्यकरणी यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बैठक बोलावून मावळते अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील यांनी नवीन कार्यकारिणीची निवड केली.यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून गणेश लोखंडे,उपाध्यक्ष माणिक भिसे , सचिव , प्रदीप देशमुख, सहसचिव विठ्ठल ताटे पाटील , देविदास डांगे कार्याध्यक्ष ,लक्ष्मण कांबळे कोषाध्यक्ष तर अमजद पठाण , सुर्यकांत मालीपाटील,लक्ष्मण भिसे ,दिंगंबर तेलंग,धम्माजी गुंडीले यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.या नविन कार्यकारणीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.