चिमुकल्यांच्या सहभागाने १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला आली रंगत; आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थिती
हिमायतनगर, अनिल मादसवार| भारत माता कि जय... वंदे मातरम... जय जवान जय किसानच्या जयघोषाने हिमायतनगर शहरासह तालुका भरातील शासकीय निमशासकीय कार्यालय आणि सर्व नागरिकांनी घराघरांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरा केला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत महोत्सव साजरी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन आणि मुख्याधिकारी वर्ष ठाकूर - घुगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यांच्या सूचनेनुसार हिमायतनगर तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. त्यात हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार श्री अवधाने यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शहरात सर्वात अगोदर म्हणजे ७.०५ मिनिटांनी येथील पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनर यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांच्या हस्ते ७.५५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती डॉ.प्रकाश वानखेडे यांच्या हस्ते ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.डी.गायकवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येउन सकाळी ७.३५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्या हस्ते ८.३५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात श्री शनेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महावितरण कार्यालयामध्ये उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वनपरक्षेत्र अधिकारी कार्यालय, भारतीय स्टेट बैंकेत शाखाधिकारी तसेच शहरातील सर्व जी.प. शाळा आणि खाजगी शाळा, महाविद्यलयात संबंधित मुख्याध्यपकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. गुरुकुल इंग्लिश स्कुलमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. नृसिंह इंग्लिश स्कुलमध्ये संचालक संजय मारावार यांच्या हस्ते झाले. तसेच शहरासह तालुक्यातील शाळा, कोलेज, महाविद्यालय, बैंका, संस्था, यासह अनेक ठिकाणी शांततेत त्या - त्या विभागाच्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर, जेष्ठ, स्रेष्ट नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे शाळेतील चिमुकल्या बालकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीतून शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. ध्वजारोहणानंतर चिमुकल्यांना खाऊचे वितरण करण्यात आले. तसेच अनेक चिमुकल्यांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करून तिरंग्याला मानवंदना दिली. एकूणच १५ ऑगस्ट ७५ व्य वर्धापन निमित्ताने ठिकठिकाणच्या चिमुकल्यांच्या अप्रतिम प्रदर्शन करत शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. तसेच आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले. याचप्रमाणे शहर व तालुक्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत आदी ठिकाणी तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना देण्यात आली असून, एकूणच शहर व तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.