अर्धापूर| तालुक्यातील कामठा(बु )गावातील श्री बसवेश्वर हायस्कूल शाळेच्या रस्त्याच्या कामासाठी व पुलांसाठी राज्य महामार्गावर दीड तास विद्यार्थ्यांनी व पालकांनी भर पावसात रस्ता रोको केल्यामुळे वाहनाच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.
कामठा बु ते सावरगाव पाटी पर्यंतचा एक किलोमीटर रस्ता व नाल्यावरील पूल यासाठी महाविकास आघाडी सरकारने जवळपास तीन कोटी रुपये निधी देऊन मंजूर केला परंतु शिंदे शिवसेना व भाजपा सरकारने या कामासाठी स्थगिती दिली.ही स्थगिती उठवून रस्ताचे व पुलाचे काम त्वरित करण्यात यावे व विद्यार्थ्यांची हेळसांड थांबवावी या मागणीसाठी 222 राज्य महामार्गावर पावसात जवळपास दीड तास रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंघ कामठेकर, सचिव शंकर कंगारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे पाटील, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस पप्पू पाटील कोंढेकर, सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे, माजी सभापती मंगलताई स्वामी, माझी सरपंच शिवलिंग स्वामी, राजेश निकम, देविदास मुस्तरे,संजय साखरे, मेघाताई स्वामी व विद्यार्थ्यांनी रस्त्या विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता चोपडे, मंडळाधिकारी खंडागळे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव आदींनी मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार, चंद्रकांत सोमवारे, म्हणतअपा बरगळ, उमाजी भद्रे, आनंदराव देशमुख, चंदबसी दासे, सोमनाथ दासे, रोही पाटील बंडाळे, प्रतापसिंग कामठेकर, विश्वनाथ पाटील, भीमराव गव्हाणे सतीश व्यवहारे,शिल्पा सिद्धार्त गव्हाणे, राधिका संजय गव्हाणे, इरबा गुंजकर, वीरभद्र बरगळ, सारंग स्वामी आदि पालक व विद्यार्थी असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.