हजारो रिपीटर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिली फेज-१ आयआयबी फास्ट
तब्बल ३००० नीट रिपीटर्स विद्यार्थ्यांना मिळणार पीसीबी साठी स्कॉलरशिप'
येत्या १६ ऑगस्ट २०२२ पासून रिपीटर्स साठीच्या नवीन बॅचला सुरूवात..
नांदेड। देश पातळीवर एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेसाठी कौतुकास पात्र ठरलेल्या 'आयआयबी ने नीट-२०२३ मध्ये एक प्रयत्न करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'आयआयबी' 'फास्ट' म्हणजेच फ्रि ॲडमिशन कम सलेक्शन टेस्ट च्या घोषणेनुसार काल रविवारी ७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने नांदेड,लातूर व पूणे आदी तिन्ही शाखांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फेज-१ आयआयबी फास्ट परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत देशभरातून प्रचंड प्रतिसाद दिला असल्याची माहीती टिम आयआयबीच्या वतीने देण्यात आली .
यावर्षी पार पडलेली नीट-२०२२ ही परिक्षा ही कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित होय परंतु अनेक सक्षम विद्यार्थीही आपल्या क्षमतेस अपेक्षित अशी साजेशी कामगिरी पार पडलेल्या नीट मध्ये करू शकले नाहीत अशी भावना अनेक विद्यार्थी व पालकांनी टिम आयआयबीशी भेटून व्यक्त केली व एकंदर परिस्थिती लक्षात घेत नीट-रिपीट करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव आयआयबी ने 'आयआयबी फास्ट' ही अभिनव योजना सलग दुसऱ्या वर्षी रिपीटर्स साठी जाहीर केली आहे .
नीट – २०२३ व्दारे एमबीबीएस प्रवेशासाठी पुन्हा तयारीस ईच्छूक विद्यार्थ्यांसाठी आयआयबी फास्ट नुसार ३००० विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे स्कॉलरशिप ही योजना नांदेड ,लातूर आणि पूणे या तिन्ही शाखांमध्ये एकाच वेळी राबवण्यात येणार आहे अशी माहीती संचालक प्रा.बालाजी वाकोडे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली होती . रिपीटर्स साठीच्या आयआयबी फास्ट निवड चाचणी परिक्षेसाठी आयआयबी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईनव्दारे हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होत फेज-१ आयआयबी फास्ट ही परिक्षा देत यावर्षीही उदंड प्रतिसाद दिला आहे.