देगलूर| विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस व श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दिनांक 18 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी झेंडा लाईन गल्ली देगलूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक 11,111 रुपयांचे ॲड अंकुश देसाई देगावकर यांच्या तर्फे होते ते श्री जय गणेश मंडळ गोविंदा पथक पेठामरापूर गल्ली यांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक 7555 रुपयांचे होते ते श्री जयवर्धन धोंडीबाराव कांबळे यांच्या तर्फे होते ते दोन टीम मध्ये विभागून देण्यात आले द्वितीय पारितोषिक डीजे बॉईज ग्रुप गोविंदा पथक व श्रीराम जन्मोत्सव समिती या दोन टीम मध्ये द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉक्टर सुरेंद्र भाऊ अलुरकर, प्राध्यापक गिरीश वझलवार भाऊ, गिरीश गोळे भाऊ, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ हरिभाऊ घुमे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत जी पदमवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश जी निलमवार, भाजपाचे शहराध्यक्ष अशोक अण्णा गंदपवार, माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार, बस्वराज पाटील वनालीकर, नंदू अण्णा शाखावार, संजय चिंनमवार, संतोष पाटील, भास्कर कांबळे, अशोक साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष अशोक कांबळे, गणेश सावकार काप्रतवार, अरुण पाटील हंगरगेकर, श्रीकांत सावकार मेडेवार, साईनाथ सावकार चिंतावार, राजू कुरलेवार, विजय उनग्रतवार, चंद्रकांत कोंडे, कदम पाटील, डॉ माशेटवार, डॉ दाचावार, प्रा संजय पाटील,
मारोती पुलूचवार, सचिन जी कांबळे, सुनील येशमवार, सुमित कांबळे, ज्ञानेश्वर पबितवार, पत्रकार मनोहर देगावकर, नामदेव थडके, तुकाराम कोकने पाटील, बालाजी पाटील थोटवाडीकर, अत्री पाटील, राहुल थडके, कैलास बंडगर, दत्ता भाऊ पांचाळ, गजु देसाई, बस्वराज पंचडे, साई गंदपवार, सुरेश मिसाळे, अजय कडलवार, अनिल कोंडेकर, सचिन ढगे, संतोष भवानीपेठकर, अशोक भवानीपेठकर, संजय उपलंचवार,सुदर्शन पुलगमवार, गंगाधर सुरकुटलावार, बाबुराव सावळे, माधव पाटील पाळेकर, लहान मोठे बंधू, मित्र परिवार, प्रायोजक, आयोजक, हितचिंतक व शेकडो रामभक्त गोविंदा पथक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल व श्रीराम जन्मोत्सव समिती देगलूरच्या वतीने करण्यात आले.