मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल -NNL

माहिती मिळाल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन


नांदेड |
कुमारी विद्या अनिल कांबळे वय वर्षे 17 हिला दिनांक 13 जून 2022 रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार तिच्या आजोबाने शिवजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. वय वर्षे 70 असलेले बालाजी कोडिंबा दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनने तपासाला गती दिली आहे. 

सदर कु. विद्या अनिल कांबळे हिचा रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फूट अंगात फिकट काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात निळ्या रंगाची चप्पल आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ही मुलगी कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे 02462-256520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी 9970073425 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी