हिमायतनगर| शेतीकडे जाण्याचा परंपरागत वहिवाट रस्ता अडविल्यामुळे शेतीकामासह पेरण्या रखडल्या आहेत. रस्त्यासाठी तहसील, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्याकडे खेटे मारले मात्र रस्ता दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मी आजपासून तहसिलसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत माझ्या शेतीचा रस्ता मोकळा करून दिला जात नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा पवित्र हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील युवा शेतकरी प्रकाश आनंदराव देवसरकर यांनी घेतला आहे.आतातरी तहसीलदार शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करून देण्याचे धाडस करतील काय...? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील युवा शेतकरी प्रकाश आनंदराव देवसरकर व दत्ता आनंदराव देवसरकर यांचा शेती आहे. त्यांच्या शेतीला जाण्यासाठी इतर शेतकऱयांच्या शेताच्या काठावरून असलेल्या धुऱ्यावरून शेतीकडे जाण्याचा वहिवाट रस्ता परंपरागत आहे. असे असताना अलीकडील शेतकऱ्याने मागील काही दिवसापासून सदरील रस्ता बंद केल्याने युवा शेतकऱ्यास शेतीकामासाठी जाणे -येणे अवघड बनले आहे. आत खरेप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱयाने फेब्रुवारी महिन्यात येथील तहसीलदार डी. एन गायकवाड यांचेकडे अर्ज देऊन शेतीसाठी असलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याव्रुन वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार २४ मार्च २०२२ रोजी रस्ता मोकळा करून देण्याचे असल्याने रास्त मोकळा करून देण्याची तारीख ३० में च्या अनुषंगाने तश्या नोटीस देखील काढण्यात आल्या होत्या. मात्र अचानक ती तारीख पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर रस्ता मोकळा करून देण्यासाठी २० जून हि तारीख देण्यात आली मात्र यावेळी सुद्धा रस्ता मोकळा करून देण्यास हिमायतनगर तहसील प्रशासनाने टाळाटाळ चालविली.
त्यामुळे शेतकरी प्रकाश आनंदराव देवसरकर व दत्ता आनंदराव देवसरकर यांनी हिमायतनगर येथे डी.२१ जून रोजी आलेले उपविभागीय अधिकारी यांचेकडे तक्रार देऊन शेतीसाठीच वहिवाट रस्ता मोकळा करू देण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी साहेबानी तहसीलदारास रस्ता तात्काळ मोकळं करून देण्याचे कळविले. मात्र यावरही तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी महोदयांनी शेतीसाठीच रस्ता मोकळा करून देण्यास टाळाटाळ चालविली. त्यामुळे नाईलाजास्तव डी.०७ जुलै पासून शेतकरी प्रकाश आनंदराव देवसरकर यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर भर पावसात आमरण उपोषण सुरु केले आहे. हि बाब समाजातच तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी यासह अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन रस्ता काढून दिल्या जाईल उपोषण मागे घ्या अशी विनन्ती केली. मात्र उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी अगोदर रस्ता मोकळा करून द्या तसे पुरावे दिल्यानंतरच उपोषण सोडण्यात येईल असा पवित्र घेतला आहे.
एकूणच आजच्या या प्रकारामुळे हिमायतनगर तहसील कार्यालयात कसा भोंगळ कारभार चालतो हे दिसते आहे. हा एक प्रकार असा आहे तर तालुक्यातील असे किती अर्ज पेंडिंग असतील आणि त्यामुळे किती शेतकऱ्यांना रस्त्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो हे सिद्ध होते आहे. एकीकडे शासनाने पांदण व वहिवाट रस्ते मोकळे करून सर्व शेतकऱ्यांना रस्ते व्हावे यासाठी उपक्रम राबविला असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यास हककच्या रस्त्यासाठी उपोषण करावे लागते हि दुर्दैवाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया उपोषण स्थळी भेट दिलेल्या अनेकांनी व्यक्त केली, आता यावर तरी उपोषण सुरु केलेल्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी जाणारा वहिवाट रस्ता मोकळा करून न्याय दिला जाईल कि...? स्वार्थापोटी तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांस संघर्ष करण्यास भाग पडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.