माजी आमदार प्रदीप नाईक यांचा इस्लापुर शिवणी अप्पारावपेठ परिसरात दौरा
शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट माहूर तालुक्यात मागील दहा दिवस झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तर खरीप हंगाम च्या सुरुवातीला मृगनक्षत्रच्या दरम्यान वेळी अवेळी पाऊस झाल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांच्या अनेक मंडळात दुबार पेरणीच्या संकटाला सामोर जावे लागले होते.या यानंतर या महिन्याच्या दि.०९ जुलै पासून १६ तारखेपर्यंत सतत झालेल्या पावसामुळे जी कवळी पिके उदयास आली होती.ती या अतिवृष्टीमुळे कोमेजून गेली तर मोठ्या प्रमाणात शेत खरडून उभी पिके वाहून गेल्या या साठी आता शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी दि.२० जुलै रोजी इस्लापुर शिवणी अप्पारावपेट च्या दौरा दरम्यान प्रसार माध्यमातून किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपाल्या आक्रमक भूमिकेत मत व्यक्त केले.
किनवट माहूर परिसर सह तालुक्यातील इस्लापूर जलधारा शिवणी परिसरात पावसाचे पाणी व पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात शेतीपिके वाहून गेल्या,शेत जमिनी खरडून गेल्या,या यासोबतच पशु जीवित हानी झाली आहे.या मुळे आता शेतकऱ्यांकडे जे होते ते संपले तर आर्थिक दृष्ट्या शेतकरी हवालदिल झाला आहे.त्या करीता किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये आधी तात्काळ द्या नंतर पंचनामे करा.अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असे मत किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी अप्पारावपेठ येथील नवनिर्वाचित सरपंच अब्दुल रब यांना शुभेच्छा दिल्या.व येथील निजम कालिन थोरा तलावाची पाहणी केली.तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,अनिल कराळे पाटील,माजी जि.प.सदस्य प्रतिनिधी शिवराम जाधव, ग्रामसेवक एस.एल.पोगुलवार ,चंद्रकांत आरंडकर,मनोज राठोड सरपंच श्रीराम रेड्डी,उत्तम नानु,माजी सरपंच भोजरेड्डी नुतुल,रुपसिंग राठोड,बंडू उरे,भोजराज देशमुख,मनोज राठोड,सावन जयस्वाल,बाळू शेरे,दिगंबर बोंदरवाड,ज्ञानेश्वर राउतवाड, कौड यरना,विजय जाधव, शेख जब्बार,प्रदीप सावते, निखिल दुर्वे,रमजान सह इस्लापुर,जलधारा शिवणी अप्पारावपेठ येथील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.