हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील एके प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या घरी मध्यरात्रीच्या २ वाजता घटक शस्त्र घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी धुमाकूळ माजवत मारहाण करून तब्बल ५० लाखाचे सोने चांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकात भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हदगाव शहरात प्रतिष्ठीत व्यापारी यादवअप्पा गंधेवार यांच्या घरी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. यादव गंधेवार यांचे पत्नीसह मुलगा, सून, नातू, असा मोठा परिवार एकत्र राहतात. या कुटुंबाकडे शेकडो एकर शेती असून, परंपरेनुसार वडीलोपार्जित सोने, चांदीचे दागदागिने त्यांच्या घरात आहेत. ते खानदानी श्रीमंत घराणे असल्याने दि.१६ जुलैच्या मद्यरात्री २ वाजेच्या सुमारास कांही दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या पाठीमागून आत प्रवेश केला.
चोरट्यानी प्रथम वयस्कर असलेल्या पती-पत्नीला एका खोलीत डांबून इतर सर्व कुटूंबियांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. सहा महिन्याच्या चिमुकल्या बाळाला घेऊन दरोडेखोरांनी गळ्यावर चाकुठेवत गंधेवार कुटूंबियांना तिजोरीच्या चाब्या मागून कपाटे उघडली. कपाटातील सर्वात महाग असलेल्या सोन्याचे दागिणे जवळपास ५० लाख रुपये किमतीचे अंदाजे ७१ तोळे सोने लुटून पोबारा केला.
जाताजाता दरोडेखोरांनी गंधेवार व शेट्टी कुटूंबियांना एका खोलीत बंद करून बाहेरचा रस्ता धरला सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास खोलीत बंद केलेले सर्वजण कसेबसे दार तोडून बाहेर येऊन सकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन हदगाव येथे येऊन रात्रीला घडलेला घटनाक्रम सांगितलं. पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळ गाठून लागलीच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले.
तासाभरात दाखल झालेल्या श्वान पथकाने छोटयाचा मग काढण्यासाठी पसरीसार पिंजून काढला मात्र चोरटे कुणीकडे गेले याचा शोध लागला नाही. चोरट्यानी जात जात याचा गल्लीतील दोन दुचाकी गाड्या पळून जाण्यासाठी चोरून नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच या घटनेमुळे हदगाव शहरात भीतीचे वातावरण निर्मण झाले असून, चोरट्यापासून नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी रटारगास्ट वाढवावी आणि तात्काळ शोध लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे.