११२ रूग्णांची विशेष तपासणी तर ७ रूग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड
मुखेड उपजिल्हा रुग्णालया मोफत कर्ण विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आज दि.१७ जुलै रोजी कानाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आली होती .या महत्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्हा शल्याचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात तालुका परिसरातील एकूण ११२ कानाचे विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबारासठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये डॉ.आश्विन लव्हेकर लव्हेकर (हॉस्पिटल नांदेड) , डॉ. गजानन कंचेवाड , ऑडियोलोजिस्ट ऐश्वर्या पाटसकर मॅडम यांनी रूग्णांची विशेष तपासणी करून उपचार केले आणी यातील ७ रुग्णांची कानाच्या शस्त्रक्रियेसाठी निवड केली .निवड करण्यात रुग्णांची शस्त्रक्रिया हि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे करण्यात येणार आहे .
या शिबिरीसाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर कदम , वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर तहाडे , डॉ.गोपाळ शिंदे ,डॉ.शोभा देवकते,डॉ. संभाजी कदम , डॉ.शैलेश देशमुख,डॉ. उमाकांत गायकवाड , डॉ संतोष टाकसाळे , पी.जी.सगर , माधव तोटवाड , योगेश पावरा , डॉ शेट्वाड , यमालवाड सिस्टर , केंद्रे सिस्टर , पांचाळ सिस्टर , प्रशांत बनसोडे , लखन पवार यांच्या सह उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी शिबिराच्या यशस्वितेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित परिश्रम घेतले.