१९८३ ला मन्याढ नदीमुळे पुनर्वसन झालेल्या कूंचेली येथे कोणताहि नकाशा व पुरावा नसताना डोझर ने उकरून जमीन ताब्यात -NNL

शेतकऱ्यांची जमीन ताबा घेणार्याना प्रशासन रोकेल काय?चंपतराव डाकोरे पाटिल यांचे लोकशाहि दिनी निवेदन


नायगाव। 
तालुक्यातील कुंचेली हे गाव १९८३ ला मन्याढ नदी मुळे पुनर्वसन झालेले आहे. पुनर्वसनासाठी तिन गुंठ्याचे प्लाट व सोई सवलती नविन गावात दिलेल्या आहेत दलित वस्तीतील बौधवाडा पुर्ण घराचे नविन गावात ३९ वर्षापासुन वास्तव्य आहे. २८  मे २०२२ रोजी आमचे घर होते म्हणून सर्व बोध्दवाडा वस्तितील नागरीक चाळीस वर्षाचे पडलेल्या घराची निशानी किंव्हा कोणताहि नकाशा किंव्हा पुरावा नसताना डोझर ने पडीत असलेली घराची जागा उकरून सपाटिकरण करून शेती करण्याचा प्रयत्न करीत असताना शेजारील शेतात माती दगड टाकुन आम्हचे घर ईथुन आहे म्हणुन शेतीचा कब्जा दिव्यांग ,व छोट्या शेतकर्याच्या  शेताचा घेत असताना आम्हि शेतकरी खालील प्रशासन यांची प्रत्यक्ष भेटुन निवेदन खालिल प्रशासनास दिले.

१) वरील विषयी ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कुंचेली यांना दि.४ जुन २०२२, २) मा.तससिलदार साहेब नायगाव दि.१ जुन २०२२,दि.६ जुन २०२२, ३) मा. सहपोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन रामतिर्थ दि. ९ जुन २०२२, ४) मा.गटविकास अधिकारी साहेब.नायगाव दि.२४ जुन२०२२, रोजि देऊन वारंवार भेटुन विंनती केली असता दि.१६ जुन २०२२

रोजी तलाठी,मंडल अधिकारी येऊन पंचासमक्ष पंचनामा करून शेजारील शेतात माती दगड,व उंचवटा असल्यामुळे बाजुच्या शेताचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान होऊ शकते, असा पंचासहित पंचनामा सादर करून प्रशासनाने कोणतीहि नोटिस किव्हा तंबि दिली  नसल्यामुळे दि.३० जुनला पेरणी केली असल्यामुळे शेजारील शेतकर्यानी सामुहिक निवेदन लोकशाहि दिनी जिल्हाअधिकारी, पोलिस अधिक्षक यांना देऊन बाजुने कमकुवत दिव्यांग ,छोट्या शेतकऱ्याना सातबारा वरील जमीनीचा ताबा द्यावा 

अतिक्रमण करणाऱ्याना पावबंध करून आम्हा छोट्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निवेदन लोकशाहि दिनी जिल्हा अधिकारी, पोलिस अधिक्षक साहेब,यांच्याकडे खालिल शेतकऱ्यांनी केली. डाकोरे चंपतराव विश्वंनाथराव दिव्यांग प्रकाश शिंपाळे, अनिल शिंपाळे शेष्याबाई जयसिंग प्रसिध्दी पत्रक दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी