नांदेड। उदयपूरमधील हत्येनंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदू टेलरची हत्या केल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कन्हैयालाल टेलर असे हत्या करण्यात आलेल्या टेलरचे नाव आहे. तसेच अमरावती येथे सुद्धा औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली तसेच हरियाणा येथील हिंदू कार्यकर्त्यांची हत्या त्याचबरोबर हरियाणा येथेच पोलीस अधिकाऱ्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली.
ह्या हत्येच्या मागे जिहादी षडयंत्रकारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत असून त्यानिमित्त सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद - बजरंग दल व इतर हिंदू संघटना तर्फे दि.२४ रविवार रोजी सकाळी ११.३० वा. मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, आज अश्या जिहादी वृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक राहिला नसून त्यांना पोलीस प्रशासनाचे भय सुद्धा राहिले नाही.
अश्या प्रकरणावर वेळीच सावध होऊन शासनाने योग्य ती कारवाई करावी व आरोपींना फाशीची शिक्षा देऊन निष्पाप मारल्या गेलेल्या हिंदूंना न्याय द्यावे असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे, मोर्चा मध्ये येताना पुरुषांनी तसेच महिला वर्गानी भगव्या पोशाखात येण्याच्या प्रयत्न करावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे, यावेळी नांदेड शहरातील व्यापारी,सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते, समाजाचे अध्यक्ष , हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.