नायगाव। मु.पो. बरबडा ता. नायगांव. जी. नांदेड. येथील रहिवाशी नागोराव एम तिप्पलवाड सर यांची रक्तदान क्षेत्रात केलेल्या भरीव, अमूल्य कामगिरीमुळे त्यांची "रक्तदाता समिती, नांदेड" जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.
नागोराव एम तिप्पलवाड हे दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाता आहेत. ओ निगेटिव्ह ग्रुप हा त्याचा रक्तगट आहे.आता पर्यंत त्यानीं 19 वेळा रक्तदान केल आहे.त्यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलांनी पण आतापर्यंत अनेक वेळा रक्तदान करून जीवनदान दिले आहे. नांदेड मध्येच नसून अनेक जिल्ह्यात जाऊन त्यानीं रक्तदान केलं आहे. थोडक्यात. नांदेड, नागपूर, गोंदिया, लातूर,
त्यांचे हे कार्य अनमोल कौतूकास्पद आहे. त्यांच्या ह्या कार्याची दाखल घेऊन रक्तदाता समितीचे संस्थापक अध्यक्ष डि. एम. गायकवाड सर यांनी त्यांची निवड केली आहे. त्याबद्दल जील्हा समन्वयक नांदेड.श्री. माधव सुवर्णकार, जिल्हा समन्वयक नागपूर.सौ. पूजा अवचट, रमेश डहारे, सुप्रिया अधव, सेजल झोडे, प्रमोद पाटील, सुरेश पाटील इटग्याळ, सचिन कंटेवाड, या सर्व रक्तदाता मित्रमंडळी कडून तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी,व्ही टी सुरेवाड सरपंच माधवराव कोलगाने उपसरपंच सौ छायाताई धर्माधिकारी बालाजीराव धर्माधिकारी सदाशिव पाटील पचलिंग बालाजी जेंगिलवाड बालाजी घोसलवाड तसेच सर्व शिक्षक मित्र व गावकरी मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
रक्ताची कुणाला कधी कशी गरज लागेल व कुणाच्या माध्यमातून पूर्ण होईल सांगता येत नाही. यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आपल्या जिल्ह्यात ग्रुप मध्ये सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा व इच्छा असेल तर सदर समाज कार्यात सहभाग घ्यावा असे आव्हान संस्थापक अध्यक्ष डि. एम. गायकवाड सर व नागोराव तिप्पलवाड यांनी केले आहे.