नांदेड| जिल्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील मौजे पांगरी येथील घरात पलंगावर निद्रिस्त असलेल्या ठिकाणी कौलारू घराच्या लाकडाच्या छतावरून खाली पडलेल्या विषारी सापाने दिड वर्षाच्या बालकास दंश केल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली असून, या दुर्दवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातील मौजे पांगरी येथील सुमेध उत्तमराव लांडगे यांचें कौलारू घर आहे. नित्याप्रमाणे सुमेध व त्यांचे कुटुंब दिड वर्षाचा मुलगा सानिकेत पलंगावर झोपले होते. सध्या पसवसल्याचे दिवस असल्याने साप घरात कधी आला हे कोणालाच डोळ्यासमोर दिसले नाही. मात्र गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास साप अचानक लाकडाच्या आड्यावरुन दिड वर्षाच्या चिमुकल्या बालकांच्या बाजुला खाली पडला. त्या विषारी सापाने सानिकेतला दोन वेळेस दंश केल्याने बालक रडु लागला. हि बाब लक्षात येताच आई वडील उठताच चिमुकल्या मुलाला साप चावला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने त्यांनी चिमुकल्या बालकाला धर्माबाद येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वेणुगोपाल पंडित यांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शुक्रवारी सकाळी पांगरी येथे मयत बालकाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस सुरु असुन, सतत पाऊस पडत असल्याने गावात विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे. गावात पुरवठा करणारी तीन डीपी जळाले असुन, वारंवार सांगून अद्याप दुरुस्ती केले गेली नाही. गावात सतत अंधार पडत असल्याने बिळातील विंचू, सरपटणारे प्राणी किडे बाहेर येत असल्याने याची भीती नागरिकांना वाटत आहे. महावितरण अधिकारी यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन डीपी बसवावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. मयत चिमुकला बालकांचा मृत्यू झाला यामुळे आम्हा गावकऱ्यांना दु:ख झालं आहे असे गावातील नागरिक चंद्रकांत पाटील पांगरीकर यांनी सांगितले.