जिल्हा परिषदेसाठी मुखेड तालुक्यात अनुसुचित जातीसाठी एकही मतदारसंघ राखीव नसल्याने दिग्गज मंडळीची स्वप्ने भंगल्याने अनेकांनी नाराजी
मुखेड, रणजित जामखेडकर| जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी काढण्यात आली.जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत नांदेड येथील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. तर मुखेड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात दुपारी ४ वाजता देगलूरचे उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा, तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ८ गटांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत नांदेड येथे सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात यामध्ये १) जांब - ना.मा.प्र - पुरूष ,२) सावरगाव पि - अ.जमाती - स्त्री ,३) एकलारा - ना.मा.प्र.- स्त्री,४) चांडोळा - खुला प्रवर्ग पुरुष,५) बाऱ्हाळी - खुला प्रवर्ग पुरुष ,६) येवती - खुला प्रवर्ग स्त्री,७) दापका गुंडोपंत खुला प्रवर्ग स्त्री,८) मुक्रामाबाद ना.मा.प्र स्त्री या प्रमाणे तालुक्यातील जिल्हा परिषद नांदेड येथे तर पंचायत समितीच्या १६ जागेच्या निवडणुकीसाठी मुखेड तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.
यामध्ये १) जांब (बु) - अ.जाती २) शिरूर दबडे अ.जाती स्त्री, ३) सावरगाव पि - सर्वसाधारण स्त्री ,४) शिकारा - अ.जा महिला,५) एकलारा - सर्व साधारण स्त्री ६)जाहुर - ना.मा.प्रवर्ग ७) चांडोळा - सर्वसाधारण स्त्री, ८) बेटमोगरा सर्वसाधारण, ९) बारहाळी सर्व साधारण,१०) सकनूर अनुसूचित जमाती स्त्री, ११) येवती सर्वसाधारण, १२) होनवडज अ. जाती स्त्री , १३) दापका सर्वसाधारण १४) हाळणी ना.मा.प्र स्त्री,१५) मुक्रमाबाद सर्व साधारण, १६) गोजेगाव ना.मा.प्रवर्ग साठी राखीव करण्यात आली आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा तहसीलदार काशीनाथ पाटील, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार मामीलवाड , महसूल सहायक प्रशांत लिंबेकर यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी तालुक्यातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे होम पिंच मधील गट आणी गण आरक्षित झाल्याने दिग्गज मंडळीची ऐनवेळी गोची झाली आहे . तर अनेक ठिकाणी मोठी तयारी केलेल्या गटातील नेत्यांची स्वप्नभंग झाले . मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली होती . सध्या जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ठाकूर यांच्याकडे आहे. लवकरच लोकप्रतिनिधी च्या हाती सुत्रे येतील आणी जिल्ह्याच्या गतीमान विकासाला चालना मिळेल .