नांदेड। गुणवत्ता वाढीसाठी गावातील प्रत्येक विद्यार्थानी प्रयत्न करावेत , व शाळेतील शिक्षकांनी पुढाकर घेऊन शाळेचे व गावाचे नाव लोकीक करावे यासाठी ग्रामपंचायत कडुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असल्याचे अभिमान व पहिली घटना असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रंसगी केले.
ग्रामपंचायत टाकळगाव ता.लोहा यांच्या वतीने गावातील दहावी व बारावीच्या परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिक्षणा अधिकारी(माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता.लोहा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संभारभाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय प्रांगण येथे दि.२८ जुलै रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती पंचायत समिती लोहा आनंदराव पाटील शिंदे , प्रशांत दिग्रसकर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी, माजी सभापती शंकर पाटील ढगे, रामराव पाटील मोरे, तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव मोरे पाटील, मुख्याध्यापक नामदेव पवळे ,शिवहार पाटील लामदाडे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी,शिक्षणाला सहकार्य करण्यासाठी ग्रामपंचायत ने केलेले सहकार्य उल्लेखनीय कार्य असल्याचे सांगितले व गुणवंत विद्यार्थी बद्दल मार्गदर्शन केले.हर घर तिरंगा ध्वज बाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी सभापती आंंनद पाटील शिंदे,शंकर पाटील ढगे,रामराव पाटील मोरे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
ग्रामपंचायत संरपच भिमराव लामदाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन आंंनद भोग यांनी तर ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत ऊपसंरपच संभाजी चिंतोरे,सेवा सह सोसायटी चेअरमन शिवाजी पाटील मोरे, माजी संरपच काशीनाथ पाटील टाकळगावकर, दिंगाबर सावकार लामदाडे, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी केले,या वेळी अहमदपूर पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी अशोक लामदाडे ,गावातील जेष्ठ नागरिक, महिला, युवक, यांच्या सह जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व बचतगटाच्या महिला पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,आभार काशीनाथ कांबळे यांनी मानले.