नांदेड| कोरोना पूर्वी एसटीने स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणण्याचे घोषीत करून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांकडून 50 रूपये अधिकृत फी पण वसूल केली आहे. तथापि ज्येष्ठांनी प्रतिसाद न दिल्याने उपलब्ध असलेल्या ओळखपत्र जसे निवडणूक कार्ड, आधार कार्ड या आधारे सवलत देण्याचे सुरूच ठेवले होते. नंतर कोरोनामुळे बसेस बंद झाल्या. आता कोठे बसेस सुरू झाल्या आहेत तर परत स्मार्ट कार्डची सक्ती करण्याचे ऐकण्यात आले आले.
अशाप्रकारची सक्ती करून ज्येष्ठांना प्रति वर्षी काम लावणे, चार्जेस घेणे असा अन्यायकारक दंडच लावला जाणार आहे जे ज्येष्ठांच्या त्रासात आणखी वाढ करणारे आहे. तरी सदरची सक्तीची अंमलबजावणी न करता उपलब्ध असलेल्या ओळखपत्रावर एसटीची ज्येष्ठांसाठीची सवलत पूर्ववतच चालू ठेवावी तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांनी रेल्वेच्या ज्येष्ठांच्या सवलतीबद्दलही पुनर्विचार करावा. असले तुघलुकी निर्णय व प्रयोग ज्येष्ठ नागरिकांना प्रयोग शाळेतील प्राणी समजून असले चुकीचे अन्यायकारी प्रयोग ज्येष्ठावर करू नयेत अशी मागणी संतप्त ज्येष्ठांतर्फे डॉ.हंसराज वैद्य यांनी केली आहे.