भारतीय विद्यार्थ्यांना वेदशास्त्राचा अभ्यास करता यावा यासाठी “कृष्णप्रिय वेदपाठशाळा” सुरु करण्यात आली -NNL


किनवट|
“प्रथमे नार्जिता विद्या व्दितीय नार्जिंते धनम् । , तृतीय नार्जिते पुण्यं चतुर्थे किं करिष्यसि ॥ या संस्कृत वाक्यानुसार जिवनाच्या प्रथम भाग विद्या, व्दितीय भागात धन व तृतीय भागात पुण्यं नाही कमवले तर चौथ्या भागात काय करणार ? या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्याकरिता जगातील विविध धर्मामध्ये आध्यात्मचा मार्ग सांगितलेला आहे. यानुसार विविध ज्ञानपिठे जगात चालवली जातात. या अणूषंगाने किनवट येथे सर्व भारतीय विद्यार्थ्यांना वेदशास्त्राचा अभ्यास करता यावा या दृष्टीने शहरातील आध्यात्मावर अगाढ श्रध्दा असलेल्या भाविकांच्या माध्यमातुन “कृष्णप्रिय वेदपाठशाळा” सुरु करण्यात आली असुन या मध्ये ज्या भारतीय विद्यार्थ्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार आहे.

शहरातील सराफा लाईन येथिल दुर्गामाता मंदिरा समोर असलेल्या ठीकाणी कृष्णप्रिय गोशाळा आरंभ करण्यात आली असुन त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. कृष्णप्रिय वेदपाठशाळेमध्ये मोफत निवास व शिक्षणाची व्यवस्था केलेली असुन या ठीकाणी वेदशास्त्रासह पारंपारीक आधुनिक शिक्षण सुध्दा विद्यार्थ्याला दिले जाणार आहे. या करिता वेदाचार्य पवन दिनकरराव बोराळकर गुरुजींना संपर्क साधावा असे हि आवाहन वेदपाठशाळेच्या विश्वस्थाकडुन करण्यात आलेले आहे. 

कृष्णप्रिय वेदपाठशाळा मध्ये प्रवेश घेण्याकरिता वयवर्ष ८ ते १४ वया पर्यंतची पात्रता असणार आहे. या वयातील विद्यार्थ्यांना वेदशास्त्र व आधुनिक शिक्षण दोन्ही निशुल्क प्रदाण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी या वेदपाठशाळेचा लाभ घ्यावा व आपल्या पाल्यांना प्रवेश करुन भारतीय संस्कृती संवर्धानाच्या या पवित्र कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन कृष्णप्रिय वेदपाठशाळेच्या विश्वस्थांकडुन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी