इसापूर धरणाचे २ गेट २० सेंटीमीटरने उघडणार; पेनगंगा नदी पात्रात १२९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग -NNL


उमरखेड/हिमायतनगर, अनिल मादसवार|
पैनगंगा नदीच्या वरील भागात असलेल्या इसापूर धरण ९० टक्के भरले आहे. आणि पाण्याचा येवा सुरूच असंल्यामुळे दिनांक २८/०७/२०२२ रोजी ५ वाजता इसापूर धरणाच्या सांडव्याच्या २ वक्रद्वारे २० सेंटीमीटर ने उघडून पैनगंगा नदीपात्रात १२९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे पात्र हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर जिल्हा नांदेड आणि पुसद ,उमरखेड, महागांव जिल्हा यवतमाळ कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील जिल्हा व तहसील प्रशासनाला कार्यालयाचे पत्र जा.क्र.उपेप्रउवि1/पुरनियंत्रण/तांशा/३६८ दि.२८/०७/२०२२ द्वारे कळविण्यात आले आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प व्यवस्थापन प्रश्नाद्वारे कळविण्यात आले आहे कि, आज दिनांक २८/०७/२०२२  रोजी १२ वाजता इसापूर धरणाची पाणी पातळी ४४०.०६ मीटर झाली असून पाणीसाठा ८७६.०२  द.ल.घ.मी. (९०.८६ %) इतका झाला आहे. तसेच इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पेनटाकळी व कोराडी प्रकल्पामधून पेनगंगा नदी पात्रात पाणी येत असल्यामुळे जयपूर बंधा-या मधून १९६६ क्युसेक्स (५५.६८ क्युमेक्स) इतका येवा इसापुर धरणामध्ये येत आहे. मंजुर जलाशय प्रचालन आराखडा नुसार ईसापुर धरणाची पाणी पातळी (दि.३१/०७/२०२२ पर्यंत) ४४०.१२ मीटर (९१.४३ %) ईतकी ठेवण्यासाठी आज दिनांक २८/०७/२०२२ रोजी ५ वाजता ईसापूर धरणाच्या सांडव्याची २ वक्रद्वारे २० सेंटीमीटर ने उघडून १२९५ क्युसेक्स (३६.६७६ क्‍्युमेक्स) इतका विसर्ग पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. 


त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. धरणामध्ये येणा-या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथबा कमी करणे बाबतचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल व तसे भ्रमनध्वनी द्वारे व व्हाटस्‌अँप ग्रुप द्रारे अवगत करण्यात येइल. तरी संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणुन आपल्या तालुक्‍यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना आपआपली गुरेढोरे, घरगुती ब शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवने ब ईतर कोणतीही जिवित व वित्त हानी होणार नाही यासाठी प्रशासकिय स्तरावरुन नदिकाठच्या गावांना सुचना देण्यात यावी असेही प्रश्नाला दिलेल्या पात्रात म्हंटले आहे. या पत्रावर एच:एस. धूळगंडे ) उपविभागीय अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प व्यवस्थापन, उपविभाग क्र.१ पेनगंगानगर यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.
 
सदर पत्राची प्रत :- मा. कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 नांदेड, मा.उपविभागीय अधिकारी ( महसुल ) उपविभागीय कार्यालय पुसद, उमरखेड, हदगांव, किनवट, कळममनुरी यांना माहितीस्तव व योग्य उपाय योजनेस्तव पटवीण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन, खंडाळा /पुसद /पोफाळी /उमरखेड /महागाव /कळमनुरी /हदगाव /हिमायतनगर/किनवट /माहूर यांना माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहिस्तव अग्रेषित करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी