नांदेड| पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती वाहनात ठेवल्याने तिरूपती बालाजी येथे दर्शनासाठी प्रवेश नाकारला आहे. याची 'शाहनिशा करून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आज शिवतीर्थ प्रातिष्ठानचे शिवभक्तांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना दिले आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, तिरूपती बालाजी येथे वाहणामध्ये समोरच्या काचे जवळ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची लहान मुर्ती असल्या कारणाने वाहणास प्रवेश नाकारला व मुर्ती काढण्यास सांगीतले जात आहे. अश्या आशयाचा व्हिडीओ २ दिवसा पासुन सोशल मिडीयावर दिसुन येत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज व तिरूपती बालाजी हे दोन्ही हिंदु धर्मीयांचे श्रध्दास्थान व शक्ती पिठे आहेत.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वाहणावरील प्रतिमेस जर तेथील टोलनाक्यावर विरोध झाला असेल तर त्याची शाहनिशा करावी जर विरोध झाला नसेल आणि कोंन्ही खोडसर पणाने व्हिडीओ व्हायरल केला असेल तर त्यांची शाहनिशा करावी आणि संबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. कारण या प्रकारामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज व तिरूपती बालाजी यांचे भक्तांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
विना कारण हिंदु धर्मीया मध्ये आपसात द्वेश पसरवण्याऱ्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर सर्व शिव भक्त व शिवतिर्थ प्रतिष्ठाण नांदेडचे सुधीर शिंदे, गोविंद भोसले, दिगंबर टापरे, श्रीकांत कदम, विजय कात्रजकर, पारस बुरसे, अक्षय भोयर, वैभव भालेराव, गोकुळ कदम, पावन पांचाळ, हरीश कुदळे, श्री धुपंलवार, महेश वाघमारे, शेषेराव हंबर्डे, माउली पवार, बाजीप्रताप मोरे, प्रथमेश भोग, ओम राठोड, श्रीनिवास वाघ, गणेश बोडके, रवी शिंदे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.