नागरिकांनी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील मौजे खरब खंडगाव ग्रामपंचायत हद्दीत मुखेड नरसी रोड वर मुस्लिम समाजाचे दारलुम असून त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे परवानगी नाही व तिथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व ते कायमस्वरुपी बंद करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन खरब खंडगाव येथील गावकरी व मुखेड तालुक्यातील हिंदू समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खरब खंडगाव ग्रामपंचायत हद्दीत मुस्लिम समाजाचे दारलुमचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून, त्याला खरब खंडगाव ग्रामपंचायतचे कसल्याही प्रकारचे परवानगी देण्यात आली नाही. प्रशासनाची सुद्धा परवानगी नसून तिथे मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले. तेथील आसपासच्या परिसरातील एकाही विद्यार्थ्यांचे तिथे प्रवेश नाही व तेथील मुस्लिम समाजाच्या उपयोगी सुद्धा नाही. त्या दारलूम मध्ये अनेक गैर कामे होत असून, येणाऱ्या काळात हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी डॉ. रणजित काळे, विश्व हिंदू परिषदेचे महेश मुक्कावार, भाजपा शहराध्यक्ष किशोरासिंह चव्हाण, पत्रकार ज्ञानेश्वर डोईजड, गिरिधर पाटील केरुरकर, पत्रकार अनिल कांबळे, कैलास पोतदार, शंकर नाईनवाड, युवासेना शहराध्यक्ष बजरंग कल्याणे, गजानन साखरे, गंगाधर आऊलवाड, शिवाजी मेकलवाड, प्रकाश शिंदे, किरण वडजे, गंगाधर पाटील, विश्वजित काळे, माधव वडजे, मारोती जाधव, अविनाश काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू समाज बांधव मोठ्या उपस्थित होते.