उमरी। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार रामायणाचार्य ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांना केज रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या उच्च पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील असंख्य वारकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या महाराष्ट्रासह इतर राज्यात अनेक कथा कीर्तने झाली आहेत.
या माध्यमातून त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला आध्यात्मिक शिकवण प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यातून अनेकांनी बोध घेतला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या कीर्तन व धार्मिक कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे.
त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून केज येथील रोटरी क्लबच्या वतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी रोटरी क्लबचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी भक्त मंडळ उपस्थित होते. परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रेल्वे डी आर यु सी मेंबर पारसमल दर्डा, जेष्ठ पत्रकार बी.व्ही चव्हाण, नरेंद्र येरावार, लक्ष्मीकांत देशमुख, शेख हुसेनी आदींनी अभिनंदन केले आहे.